नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon हे भारतासह जगभरात चांगलंच प्रसिद्ध झालेलं आहे. कारण त्यावर वस्तूंची ऑनलाइन शॉपिंग करता येते. Amazon वर लॉगिन करत असताना आणि त्याचा वापर करत असताना त्यात युजर्सची प्रायव्हेट (Amazon Collect your secret information) माहितीही सेव्ह केलेली असते. त्यातच आता अॅमेझॉनने युजर्सचा मोठा डेटा गोळा केल्याची (amazon data leak) माहिती समोर आली आहे. काय आहे हे प्रकरण अॅमेझॉनबद्दल झालाय हा खुलासा… काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील Virginia चे सिनेटर इब्राहिम समीरा यांना माहिती मिळाली होती की अॅमेझॉनवर युजर्सचा (amazon cyber security threats) प्रायव्हेट डेटा जमा केला जात आहे. त्यात युजर्सच्या सर्व दैनंदिन घडामोडींविषयी माहिती असल्यानं त्याला समीरा यांनी विरोध केला. WhatsApp वरील या Fraud मुळे होऊ शकतं तुमचं अकाउंट रिकामं; अशी घ्या काळजी अॅमेझॉनकडे आहे तुमची ही माहिती इब्राहिम समीरा यांनी याबद्दल अॅमेझॉनकडे याबाबत माहिती मागितली आहे. त्याचबरोबर न्यूज एजन्सी Reuters च्या पत्रकारांनीही याबद्दल अॅमेझॉनला माहिती विचारली आहे. त्यामुळं आता ‘तुम्ही कोणतं गाणं ऐकत आहे, कोणता चित्रपट बघत आहे किंवा तुमची आवड काय आहे?’ याबद्दल सर्व माहिती अॅमेझॉनकडे असल्याचं बोललं जात आहे. नवा फोन घ्यायचाय? दमदार बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळतायेत हे Smartphone अॅमेझॉनला प्रायव्हेट डेटाची गरज काय? अॅमेझॉनला जेव्हा विचारण्यात आलं की ग्राहकांच्या प्रायव्हेट डाटाविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यावर अॅमेझॉनने स्पष्टीकरण देताना म्हटलंय की ‘युजर्सचा अनुभव चांगला होण्यासाठी आम्ही डेटा सेव्ह करत असतो. युजर्सचा तो सर्व डेटा सुरक्षित असून त्याबाबत कोणतीही काळजी करायचं कारण नाही’, त्यामुळं आता फेसबुकनंतर अॅमेझॉनवर पहिल्यांदाच युजर्सच्या डेटाचोरीचा आरोप लागला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.