मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

48MP ड्युअल कॅमेरा सेटअपसह Samsung चा नवा बजेट स्मार्टफोन, पाहा काय आहेत फीचर्स

48MP ड्युअल कॅमेरा सेटअपसह Samsung चा नवा बजेट स्मार्टफोन, पाहा काय आहेत फीचर्स

Samsung आपला नवा स्मार्टफोन Samsung Galaxy A03 लाँच करणार आहे. या फोनची किंमत आणि उपलब्धता याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : Samsung आपला नवा स्मार्टफोन Samsung Galaxy A03 लाँच करणार आहे. या फोनची किंमत आणि उपलब्धता याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु फोनचे काही फीचर्स समोर आले आहेत.

या फोनला वॉटरड्रॉप- स्टाइल नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनच्या बॅकला स्क्वेअर कॅमेरा मॉड्यूल देण्यात आलं आहे. हा फोन ड्युअल कॅमेरा सेटअपसह लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा फोन तीन कलर ऑप्शनमध्ये बाजारात आणला असून ब्लॅक, रेड आणि ब्लू रंगात उपलब्ध होणार आहे.

काय आहेत स्पेसिफिकेशन्स -

फोनला 6.5 इंची HD+ Infinity-V स्क्रिन देण्यात आली आहे. यात ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सध्या हा नेमका कोणता प्रोसेसर आहे, याबाबत कंपनीकडून कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही.

Samsung Galaxy A03 फोनला 3GB रॅम + 32GB स्टोरेज, 4GB रॅम + 64 GB स्टोरेज आणि 4GB रॅम + 128 GB स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे.

तुमच्या Android फोनमध्ये या चुका करू नका, अन्यथा डिव्हाइस हॅक होण्याची शक्यता

कॅमेरा -

फोटोग्राफीसाठी याच्या रियरमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याच्या प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. तर 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटमध्ये 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy A03 फोनला 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

एका सेकंदात Hack होणारे सर्वात Weak Password, या लिस्टमध्ये तुम्हीही नाही ना?

Samsung ने सध्या आपल्या या लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Galaxy A03 च्या किंमतीची घोषणा केलेली नाही. हा स्मार्टफोन अपकमिंग फेसिव्ह सीजनदरम्यान काही निवडक मार्केटमध्ये उपलब्ध केला जाण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Samsung, Samsung galaxy