मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

एका सेकंदात Hack होणारे सर्वात Weak Password, या लिस्टमध्ये तुम्हीही नाही ना?

एका सेकंदात Hack होणारे सर्वात Weak Password, या लिस्टमध्ये तुम्हीही नाही ना?

अतिशय विक पासवर्डमुळे तुमचा डेटा चोरी होण्याचा धोका असतो. हॅकर्स सहजपणे पासवर्ड हॅक करू शकतात. त्यामुळे पासवर्ड स्ट्राँग ठेवणं गरजेचं आहे.

अतिशय विक पासवर्डमुळे तुमचा डेटा चोरी होण्याचा धोका असतो. हॅकर्स सहजपणे पासवर्ड हॅक करू शकतात. त्यामुळे पासवर्ड स्ट्राँग ठेवणं गरजेचं आहे.

अतिशय विक पासवर्डमुळे तुमचा डेटा चोरी होण्याचा धोका असतो. हॅकर्स सहजपणे पासवर्ड हॅक करू शकतात. त्यामुळे पासवर्ड स्ट्राँग ठेवणं गरजेचं आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : स्मार्टफोन लॉक करण्यापासून ते सोशल मीडिया अकाउंट, बँक अकाउंटसह अनेक गोष्टींसाठी पासवर्ड टाकावा लागतो. केवळ पासवर्ड ठेवणं फायद्याचं नाही, तर पासवर्ड स्ट्राँग असणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. अतिशय विक पासवर्डमुळे तुमचा डेटा चोरी होण्याचा धोका असतो. हॅकर्स सहजपणे पासवर्ड हॅक करू शकतात. त्यामुळे पासवर्ड स्ट्राँग ठेवणं गरजेचं आहे. खराब-वीक पासवर्ड सिक्योर नसतो. त्यामुळे Strong Password ठेवून अकाउंट सुरक्षित ठेवू शकता.

पासवर्ड (Password) हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्वाचा घटक बनला आहे. फोन, ऑनलाईन पेमेंट, बँकिंग व्यवहार, ई-मेल आदी गोष्टींसाठी पासवर्ड ठेवावा लागतो. एखाद्या प्लॅटफॉर्मचा वापर आपण कमी प्रमाणात करीत असलो तरी तिथे पासवर्डचा वापर करणं आवश्यक असते. अशा वेळी बहुतांश युजर कॉमन पासवर्डचा वापर करतात.

हा पासवर्ड युजरचे नाव, जन्मतारखेमधील अंक यापासून तयार केलेला असतो. यात 123456, ABCD, ABC@123 किंवा Name@123 अशा पासवर्डचा समावेश असतो. याच बरोबर काही युजर्स आपल्या मुलांचे, पालकांचे नाव किंवा चित्रपटाच्या नावापासून पासवर्ड तयार करतात. अशा कॉमन पासवर्डमुळे डेटा चोरी होण्याचा धोका असतो. हॅकर्स असा पासवर्ड अगदी मिनिटभरात क्रॅक करु शकतात. त्यामुळे असा पासवर्ड ठेवणं धोक्याचं ठरु शकतं.

- 123456, 123456789, 1111, 12345, asdfgh, 147258369 हे पासवर्ड हॅक करण्यासाठी एका सेकंदाहून कमी वेळ लागतो.

सर्वात खराब पासवर्ड -

Password, 12345, 123456, 12345678, 123456789, 1234567890, 1234567, india123, Qwerty, abc123, iloveyou, xxx

- पासवर्ड कमीत-कमी 12 कॅरेक्टर्सचा स्ट्राँग पासवर्ड असावा. पासवर्ड सेट करताना त्यात अपरकेस लेटर्स, लोअरकेस लेटर्स, नंबर्स आणि सिम्बोल सामिल असावेत.

- सर्वात खराब अर्थात वीक पासवर्ड एका सेकंदाहून कमी वेळेत हॅकर्सकडून हॅक केले जातात. india123 हा असा एकमेव पासवर्ड आहे, जो केवळ 17 मिनिटांत हॅक केला जाऊ शकतो.

- पासवर्ड हा 8 पेक्षा कमी अक्षरांचा नसावा. पासवर्डमध्ये तुमचे नाव, जन्मतारीख याचा वापर करु नका. युजर नेम हाच पासवर्ड नसावा. पासवर्ड कोणालाही विचारुन तयार करु नये

First published:

Tags: Password, Tech news