48 MP कॅमेरासह Samsung चा बजेट फोन Galaxy M21 लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स

Samsung Galaxy M21 2021 Edition 26 जुलै रोजी रात्री 12 वाजल्यापासून Amazon च्या प्राइम डे सेलअंतर्गत (Amazon Prime Day) हा नवा स्मार्टफोन ग्राहकांसाठी उपलब्ध केला जाणार आहे.

Samsung Galaxy M21 2021 Edition 26 जुलै रोजी रात्री 12 वाजल्यापासून Amazon च्या प्राइम डे सेलअंतर्गत (Amazon Prime Day) हा नवा स्मार्टफोन ग्राहकांसाठी उपलब्ध केला जाणार आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 22 जुलै: दक्षिण कोरियातली दिग्गज इलेक्ट्रॉनिक कंपनी असलेल्या सॅमसंगने (Samsung) गॅलेक्सी एम (Galaxy M Series) सीरिजमधला आपला आणखी एक स्मार्टफोन बुधवारी (21 जुलै) भारतीय बाजारपेठेत लाँच केला आहे. Samsung Galaxy M21 2021 Edition असं या नव्या स्मार्टफोन मॉडेलचं नाव असून, गेल्या वर्षी लाँच झालेल्या गॅलेक्सी एम 21 (Galaxy M 21) या स्मार्टफोनचं ते अपग्रेडेड व्हर्जन आहे. आर्क्टिक ब्लू आणि चारकोल ब्लॅक या दोन रंगांमध्ये हे नवं मॉडेल उपलब्ध आहे. 26 जुलै रोजी रात्री 12 वाजल्यापासून Amazon च्या प्राइम डे सेलअंतर्गत (Amazon Prime Day) हा नवा स्मार्टफोन ग्राहकांसाठी उपलब्ध केला जाणार आहे. Samsung.com या सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटसह ऑफलाइन रिटेलर्सच्या माध्यमातूनही हा स्मार्टफोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम 21 2021 एडिशन या स्मार्टफोनची किंमत 12,499 रुपये आहे. या किमतीला फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजचा वेरिएंट उपलब्ध आहे. 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,499 रुपये आहे.

(वाचा - टेलिकॉम कंपन्यांच्या कॉल्समुळे त्रस्त आहात? हे करून बघा नेहमीसाठी बंद होतील कॉल)

Samsung Galaxy M21 2021 स्पेसिफिकेशन्स - - अँड्रॉईड 11 One UI Core - 6.4 इंची फुल एचडी प्लस सुपर AMOLED डिस्प्ले - रिझॉल्युशन 1080x2340 पिक्सेल - ऑक्टाकोअर Exynos 9611 प्रोसेसर - ग्राफिक्ससाठी Mali-G72 MP3 GPU - 6 जीबी LPDDR4x रॅम आणि 128 जीबीपर्यंतचं स्टोरेज - 6000 mAh बॅटरी - 18 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप (Triple Rear Camera Setup) देण्यात आला आहे. त्यात प्रायमरी लेन्स 48 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सल अल्ट्रावाईड आणि तिसरा कॅमेरा 5 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे. प्रायमरी लेन्स सॅमसंगची ISOCELL GM2 या प्रकारची आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 20 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

(वाचा - नोकरी शोधणाऱ्यांसाठी Good News!याठिकाणी फक्त 4 तास काम करुन महिन्याला कमवा 60000)

सॅमसंग गॅलेक्सी एम 21 2021 एडिशन या स्मार्टफोनसाठी लाँच ऑफरही (Launch Offer) देण्यात आली आहे. हा फोन खरेदी करताना HDFC Bank डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर केला, तर 10 टक्क्यांपर्यंतचा इंस्टंट डिस्काउंट दिला जाणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. या फोनच्या कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये 4 VolTE, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस/ए-जीपीएस, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएमचा हेडफोन जॅक आहे. फोनच्या मागच्या बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर (Fingerprint Sensor) आहे. तसंच, फोनमध्ये अॅक्सलरोमीटर, अँबियंट लाइट, गायरोस्कोप, मॅग्नेटोमीटर, प्रॉक्सिमिटी सेन्सर आदी सेन्सर्सही या स्मार्टफोनमध्ये देण्यात आले आहेत. त्यामुळे या फोनची उपयुक्तता आणखी वाढली आहे.
First published: