मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

टेलिकॉम कंपन्यांच्या कॉल्समुळे त्रस्त आहात? 'हे' करून बघा नेहमीसाठी बंद होतील कॉल्स

टेलिकॉम कंपन्यांच्या कॉल्समुळे त्रस्त आहात? 'हे' करून बघा नेहमीसाठी बंद होतील कॉल्स

हे सर्व येणारे फोन आपण नेहमीसाठी बंद करू शकतो हे तुम्हाला माहिती आहे का?

हे सर्व येणारे फोन आपण नेहमीसाठी बंद करू शकतो हे तुम्हाला माहिती आहे का?

हे सर्व येणारे फोन आपण नेहमीसाठी बंद करू शकतो हे तुम्हाला माहिती आहे का?

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 20 जुलै: फोनची रिंग वाजत असेल आणि उचलताच 'नमस्कार' हा रेकॉर्डिंग असलेला शब्द ऐकू आला कि नक्कीच कंपनीचा कॉल असेल म्हणून आपण ठेऊन देतो. असे एक ना अनेक फोन आपल्याला रोज येत असतात.  यामुळे सर्वच त्रस्त असतात. कधी कुठली ऑफर सांगण्यासाठी तर कधी रिचार्ज  करा हे सांगण्यासाठी कंपन्यांचा फोन येत असतो.  मात्र हे सर्व येणारे फोन आपण नेहमीसाठी बंद करू शकतो हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना. चला तर मग जाणून घेऊया DND बद्दल.

DND म्हणजे काय?

DND म्हणजे Do Not Disturb. ही सुविधा तुमच्या मोबाईलमध्ये ॲक्टिव्हेट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर कधीच कुठल्या कंपनीचे कॉल्स येणार नाहीत. आज आम्ही तुम्हाला हे DND निरनिराळ्या कंपनीच्या सिमकार्डमध्ये कसं ॲक्टिव्हेट करायचं याबद्दल सांगणार आहोत.

BSNL आणि MTNL

यासाठी सुरुवातीला START 0 असा मेसेज टाईप करून 1909 वर सेंड करा.

यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये DND सर्व्हिस ॲक्टिव्हेट होईल.

1909 वर कॉल करूनही तुम्ही DND सर्व्हिस ॲक्टिव्हेट करू शकता.

वोडाफोन-आयडिया (VI)

यासाठी वोडाफोन-आयडियाची वेबसाईट ओपन करा.

यांनतर DND या पर्यायावर क्लिक करा.

इथे तुमचा नाव, नंबर, ई-मेल आयडी ही सर्व माहहती टाईप करा.

यानंतर DND साठी YES वर क्लिक करा.

यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल.

OTP देऊन submit वर क्लिक करा. यानंतर तुमच्या फोनमध्ये DND ॲक्टिव्हेट होईल.

हे वाचा - CBSE 10th Result: 10वीच्या निकालाबाबत मोठी अपडेट; रोल नंबरशिवाय बघता येणार निकाल

रिलायंस जियो (JIO)

यासाठी सुरुवातीला MY JIO App डाउनलोड करा. त्यानंतर लॉग इन करा.

यानंतर उजव्या हाताला दिसणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून सेटिंग्समध्ये जा.

तिथे DND सर्व्हिस दिसेल तिथे क्लिक करा.

यानंतर तुम्हाला मसेज येईल ज्याप्रमाणे तुमची DND सर्व्हिस ७ दिवसांच्या आतमध्ये ॲक्टिव्हेट होईल.

एयरटेल (Airtel)

यासाठी आधी एयरटेलची वेबसाईट ओपन करा.

यानंतर एयरटेल मोबाईल सर्विस बटणवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला एक पॉपअप बॉक्स दिसेल. यात आपला फोन नम्बर टाईप करा.

यानंतर तुम्हाला तुमच्या नंबरवर एक OTP मिळेल. हा OTP वेबसाईटवर पेस्ट करा.

यानंतर STOP All नावाच्या पर्यायावर क्लिक करा.

अशा पद्धतीनं DND ॲक्टिव्हेट होईल.

First published: