नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : Reliance Jio ने काही दिवसांपूर्वी घोषणा केलेला JioPhone Next दिवाळीपासून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. जिओ आणि गुगलने संयुक्तपणे या फोनचं डिझाइन केलं (Smartphone by Jio and Google) आहे. पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या या स्मार्टफोनची बुकिंग अमाउंट 1,999 असणार आहे. यामुळे हा जगातला सर्वांत स्वस्त स्मार्टफोन (Most Affordable Entry price) म्हणूनही ओळखला जातो आहे. नोंदणी केल्यानंतर उरलेली रक्कम तुम्ही 18 ते 24 महिन्यांच्या हप्त्यांमध्ये भरू शकता. JioPhone Next तीन प्रकारे बुक करता येऊ शकतो.
कसं कराल फोन बुकिंग -
- रिलायन्स जिओच्या JioPhone Next चं बुकिंग तीन प्रकारे करता येईल. jio.com/NEXT लिंकवर जा. त्यानंतर I am Interested पर्यायावर क्लिक करा. इथे युजरची काही माहिती मागितली जाईल, यात नाव-फोन नंबर असेल. त्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. मोबाइल नंबर वेरिफाय करावा लागेल.
- दुसरी पद्धत WhatsApp वरुन बुकिंग करण्याची आहे. त्यासाठी फोनमध्ये 7018270182 हा नंबर सेव्ह करुन त्यावर Hi पाठवावं लागेल. त्यानंतर चॅटद्वारे इतर माहिती मागितली जाईल. त्यानंतर Jio फोन बुक होईल.
- JioPhone Next जियोमार्ट डिजिटल रिटेल स्टोरवर (JioMart Digital Store) बुक करता येईल.
दरम्यान, Reliance Jio ने काही दिवसांपूर्वी ‘Making of JioPhone Next’ फिल्म रिलीज केली होती. JioPhone Next सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन असून फोनला जबरदस्त फीचर्सही देण्यात आले आहेत. Jio ने लाँच केलेल्या व्हिडीओमध्ये JioPhone Next त्यांच्या इतर सेवांप्रमाणे मेड इन इंडिया, मेड फॉर इंडिया आणि मेड बाय इंडियन्स असल्याचं म्हटलं आहे. प्रत्येक भारतीयाला समान संधी आणि डिजीटल तंत्रज्ञानाचा समान वापर करता यावा हे या फोनचं खास उद्दिष्ट आहे.
Jio आणि Google या दोघांनी मिळून JioPhone Next विकसित केला आहे. JioPhone Next Android OS वर चालेल. फोनला क्वॉलकॉम प्रोसेसर असेल अशी माहिती आहे. तसचं युजर्सला फोन योग्यरित्या ऑपरेट करता यावा यासाठी व्हॉईस असिस्टेंट फीचरही फोनला देण्यात आलं आहे. त्यामुळे युजर्स कोणत्याही भाषेत हवी ती माहिती मिळवू शकतील. त्याशिवाय युजर्सला खास ट्रान्सलेशनचीही सुविधा देण्यात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Reliance Jio