Samsung Days Sale: स्मार्टफोन आणि टॅबलेट्सवर बंपर ऑफर्स, कॅशबॅकही मिळणार

Samsung Days Sale: स्मार्टफोन आणि टॅबलेट्सवर बंपर ऑफर्स, कॅशबॅकही मिळणार

व्हॅलेंटाईन डे वीकमध्ये सॅमसंगने आपल्या काही निवडक स्मार्टफोन्स आणि टॅबलेटवर ऑफर्स आणि डिस्काऊंट जारी केले आहेत. या सेलची सुरुवात 9 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून 15 फेब्रुवारीपर्यंत हा सेल असणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी खास संधी आहे. व्हॅलेंटाईन डे वीकमध्ये सॅमसंगने आपल्या काही निवडक स्मार्टफोन्स आणि टॅबलेटवर ऑफर्स आणि डिस्काऊंट जारी केले आहेत. या सेलची सुरुवात 9 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून 15 फेब्रुवारीपर्यंत हा सेल असणार आहे.

सॅमसंग डेज सेलमध्ये Samsung Galaxy Note 10, Galaxy A71, Galaxy M31 आणि Galaxy F41 हे काही फोन सामिल आहेत. तसंच ग्राहक Galaxy Tab S7 आणि Galaxy Tab A7 सारख्या टॅबलेटवरही ऑफर्सचा फायदा घेऊ शकतात. सध्या ऑफर्ससह ग्राहक Galaxy Tab मॉडेल्सवर 10000 रुपयांपर्यंतची बचत करू शकतात. सॅमसंगने दिलेल्या माहितीनुसार, ऑफर्स आणि डिस्काऊंट 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत मिळतील. ग्राहक या ऑफर्सचा फायदा सॅमसंग इंडिया ऑनलाईन स्टोअर, काही ई-कॉमर्स पोर्टल्स आणि लीडिंग रिटेल आउटलेट्सद्वारे घेऊ शकतात.

(वाचा - QR कोड स्कॅन करून पेमेंट करताय? या फ्रॉडपासून सावध व्हा, अन्यथा बसेल मोठा फटका)

स्मार्टफोन ऑफर्स -

सॅमसंगने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक स्मार्टफोन्सवर 10 टक्के बँक कॅशबॅकचा फायदा घेऊ शकतात. Samsung Galaxy Note 10 Lite, Galaxy S10 Lite, Galaxy A71, Galaxy A51, Galaxy A31, Galaxy A21s, Galaxy M51, Galaxy M31s, Galaxy M31, Galaxy M21, Galaxy F41 आणि  Galaxy M11 वर कॅशबॅकचा फायदा मिळू शकतो.

ही ऑफर क्रेडिट कार्ड ट्रान्झेक्शन्सवर लागू आहे. तसंच डेबिट कार्ड्ससाठी ही ऑफर EMI ट्रान्झेक्शन्सवर लागू होईल. सॅमसंग इंडिया ऑनलाईन स्टोअर आणि रिटेल स्टोअर्सवर ICICI बँक कार्ड्स आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्स सामिल आहे.

(वाचा - 20 हजारांचा 5G स्मार्टफोन मिळतोय 13,999 रुपयांत; पाहा काय आहे ही जबरदस्त ऑफर)

टॅबलेट ऑफर्स -

Samsung Galaxy Tab S7 HDFC कार्डद्वारे खरेदी केल्यास ग्राहकांना 10000 रुपये कॅशबॅक मिळेल. इकोसिस्टम ऑफर्समध्ये ग्राहकांना किबोर्ड कव्हरवर 10000 रुपयांची सूट, बुक कव्हरवर 3500 आणि Galaxy Buds वर 7000 रुपयांची सूट मिळेल. तसंच Galaxy Tab S7 च्या खरेदीवर HDFC ग्राहक 9000 रुपयांच्या कॅशबॅकचा फायदा घेऊ शकतात.

Samsung Galaxy Tab S6 Lite वर HDFC बँक कार्डद्वारे 3000 रुपये कॅशबॅक मिळेल. Samsung Galaxy Tab A7 च्या खरेदीवर ग्राहकांना 2000 रुपये कॅशबॅक मिळेल.

Published by: Karishma Bhurke
First published: February 10, 2021, 12:20 PM IST

ताज्या बातम्या