• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • 20 हजारांचा 5G स्मार्टफोन मिळतोय 13,999 रुपयांत; पाहा काय आहे ही जबरदस्त ऑफर

20 हजारांचा 5G स्मार्टफोन मिळतोय 13,999 रुपयांत; पाहा काय आहे ही जबरदस्त ऑफर

रियलमीने या आठवड्यात भारतात आपल्या X7 सीरीजचे दोन दमदार 5G फोन Realme X7 आणि Realme X7 Pro लाँच केले आहेत. कंपनीकडून खास ऑफर देण्यात येत असून युजर्स हा फोन 70 टक्के स्वस्तात खरेदी करू शकतात.

 • Share this:
  नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी : रियलमीने या आठवड्यात भारतात आपल्या X7 सीरीजचे (realme X7 series) दोन दमदार 5G फोन Realme X7 आणि Realme X7 Pro लाँच केले आहेत. हे दोन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कंपनीकडून खास ऑफर देण्यात येत आहे. कंपनीने‘Real Upgrade Program’ लाँच केला असून 10 फेब्रुवारीपासून त्याची सुरुवात होणार आहे. या प्रोग्रामअंतर्गत युजर्स हा फोन  70 टक्के किंमतीत खरेदी करू शकतात. कंपनीच्या अपग्रेड प्रोग्रामचे ग्राहक 29,999 रुपयांचा रियलमी X प्रो फोन 20,999 रुपयांत खरेदी करू शकतात. तर Realme X7 6 जीबी रॅम असणारा 19,999 रुपयांचा फोन 13,999 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. रियलमी ही खास ऑफर फ्लिपकार्टसह पार्टनरशिपअंतर्गत देत आहे. यात युजर्सला चेकआउटवेळी फोनच्या किंमतीच्या केवळ 70 टक्के द्यावे लागणार आहेत. फोन खरेदी केल्याच्या एक वर्षानंतर युजर या फोनला ठेऊ इच्छित असल्यास, त्यांना बाकी 30 टक्के पेमेंट करावं लागेल.

  (वाचा - स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याने मोजा Heart Beats आणि Respiratory Rate; कसं ते पाहा)

  कंपनीने या ऑफरसह एक खास अटही ठेवली आहे. ज्यामुळे खरेदीदार एक वर्षानंतर कंपनीला फसवू शकत नाही. कंपनीने स्मार्टफोनमध्ये इन-बिल्ट लॉक दिलं आहे. अशात युजरने एक वर्षानंतर फोनला अपग्रेड न केल्यास किंवा इतर 30 टक्के पेमेंट न केल्यास, युजरचा फोन ऑटोमॅटिकली लॉक होईल. फोन अपग्रेड करण्यासाठी स्मार्टफोन चांगल्या वर्किंग स्थितीत बॉक्स, चार्जर आणि ऍक्सेसरीजसह परत करावा लागेल.

  (वाचा - 5G mobile: 30,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे भारतातले टॉप फोन आणि त्यांची फीचर्स)

  दरम्यान, Realme X7 चा सेल 12 फेब्रुवारी आणि Realme X7 Pro सेल 10 फेब्रुवारी रोजी फ्लिपकार्ट आणि रियलमी इंडिया वेबसाईटवर सुरू होणार आहे.
  Published by:Karishma
  First published: