मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Safer Internet Day 2022: तुमच्या मुलाचा Internet वापर सुरक्षित आहे का? या Tips ठरतील फायदेशीर

Safer Internet Day 2022: तुमच्या मुलाचा Internet वापर सुरक्षित आहे का? या Tips ठरतील फायदेशीर

Tech news: आजचा दिवस (9 फेब्रुवारी) हा दिवस Safer Internet Day म्हणून साजरा केला जातो. इंटरनेटचा सुरक्षित वापर व्हावा यासाठी प्रचार करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जगभरात या वर्षी 19 वा सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा केला जात आहे.

Tech news: आजचा दिवस (9 फेब्रुवारी) हा दिवस Safer Internet Day म्हणून साजरा केला जातो. इंटरनेटचा सुरक्षित वापर व्हावा यासाठी प्रचार करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जगभरात या वर्षी 19 वा सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा केला जात आहे.

Tech news: आजचा दिवस (9 फेब्रुवारी) हा दिवस Safer Internet Day म्हणून साजरा केला जातो. इंटरनेटचा सुरक्षित वापर व्हावा यासाठी प्रचार करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जगभरात या वर्षी 19 वा सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा केला जात आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 9 फेब्रुवारी: आजचा दिवस (9 फेब्रुवारी) हा दिवस Safer Internet Day म्हणून साजरा केला जातो. इंटरनेटचा सुरक्षित वापर व्हावा यासाठी प्रचार करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जगभरात या वर्षी 19 वा सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा केला जात आहे.

असं म्हणतात की, इंटरनेट हे जगासाठी 'शाप आणि वरदान' दोन्ही आहे आणि हे सर्व आपण त्यावर किती अवलंबून आहोत यावर हे सर्व अवलंबून आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोनाची साथ आल्यामुळे आता इंटरनेट वापर वाढलाय. किंबहुना आधीच्या तुलनेत खूपच जास्त वापर वाढला आहे. आपण अनेक दैनंदिन कामांसह मनोरंजन आणि कार्यालयीन कामांसाठी पूर्णपणे इंटरनेटवर अवलंबून आहोत.

कोरोना (coronavirus pandemic) काळापूर्वीही इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात होता, परंतु त्यात मुलांचं प्रमाण कमी होतं. परंतु कोरोनामुळे वर्ग ऑनलाइन भरू लागले आणि मुलांचाही इंटरनेटशी जवळचा संबध आला. ऑनलाइन भरणाऱ्या वर्गांमुळे (Online classes) मुलेही आभासी जगाच्या संपर्कात आली आहेत. जर तुम्ही असे पालक आणि शिक्षक असाल जे मुलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेबद्दल काळजी करत असतील, तर त्यांना इंटरनेटवर सुरक्षित ठेवण्यासाठी येथे आम्ही आज तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत...

हे वाचा-Google Account वरील तुमची वैयक्तिक माहिती गुप्त कशी ठेवाल? वाचा स्टेप बाय स्टेप

- तुमचा लॅपटॉप/कॉम्प्युटर पासवर्डने सुरक्षित (Password) करा आणि त्यांना तो वापरायचा असेल तेव्हा ते अनलॉक करा.

- तुमच्‍या डिव्‍हाइसमध्‍ये इंटरनेट सिक्युरिटी डाउनलोड (Download internet security ) करा आणि वेळेनुसार अपडेट करत रहा.

- तुमच्या डिव्हाइसवर पॅरेन्टल कंट्रोल्स (parental controls on laptop) वापरा ज्यामुळे मुलांसाठी योग्य नसलेल्या वेबसाइट ब्लॉक होतील.

- जर तुमचे मूल डेकेअरमध्ये, बेबीसिटर किंवा आजी आजोबांसोबत असेल, तर त्यांना टेक रुल्स आणि महत्वाची मार्गदर्शक तत्त्वे शिकवा.

- अनावश्यक त्रास टाळण्यासाठी तुमचे कार्ड डिटेल्स किंवा इतर बँकिंग पासवर्ड (banking passwords) तुमच्या मुलांसोबत शेअर करू नका.

- चोरी आणि निष्काळजीपणा टाळण्यासाठी तुमच्या मुलाला त्यांच्याकडे असलेल्या डिव्हाईसचं महत्व सांगा.

हे वाचा-गृह मंत्रालयाच्या Cyber Dostकडून अलर्ट,Onlineऔषधं मागवताना या गोष्टी लक्षात ठेवा

- तुमचे मूल टिनेजर (teenager) म्हणजेच किशोरवयीन असल्यास, त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील हालचाली किंवा ते वापरत असलेल्या अ‍ॅप्सवर लक्ष ठेवा.

- सायबर क्राईमच्या अनेक घटना रोजच्या रोज नोंदवल्या जातात. त्यामुळे तुमच्या मुलांशी मोकळेपणाने संवाद साधा आणि त्यांना येणाऱ्या समस्यांबद्दल त्यांच्याशी बोला, त्यांच्यावर लक्ष द्या.

- इंटरनेटवर अशी अनेक अ‍ॅप्स आहेत जी डिव्हाइसवर वापरल्या जाणार्‍या अयोग्य भाषा आणि मजकूरांचा ट्रॅक ठेवतात.

- मुलांसाठी संवाद साधण्यासाठी गेमिंग (gaming) हे आणखी एक प्लॅटफॉर्म बनले आहे. अनेक गेम ऑनलाइन चॅटिंगला परवानगी देतात. त्यामुळे पालक म्हणून तुम्ही मुलांशी संवादासाठी काही पर्याय ठेवले पाहिजेत.

हे वाचा-कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, हॅकर्सकडून धोकादायक Malware तयार

अशाप्रकारे तुम्ही वरील टिप्स फॉलो करून तुमचा मुलगा किंवा मुलगी इंटरनेटचा वापर योग्य रितीने करत आहेत, कि नाही यावर लक्ष ठेवू शकता. शिवाय ते इंटरनेटचा वापर सुरक्षितरित्या करत आहेत की नाही, याची खात्री करू शकता.

First published:

Tags: Games, Internet, Online, Online security, Privacy, Tech news, Technology