मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Google Account वरील तुमची वैयक्तिक माहिती गुप्त कशी ठेवाल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Google Account वरील तुमची वैयक्तिक माहिती गुप्त कशी ठेवाल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Google Account वरील तुमची वैयक्तिक माहिती गुप्त कशी ठेवाल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Google Account वरील तुमची वैयक्तिक माहिती गुप्त कशी ठेवाल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

इंटरनेटवरील काही अनिष्ट प्रवृत्ती या पर्सनल इन्फर्मेशनला टार्गेट करत आहेत. काही उपद्रवी लोक युजर्सची पर्सनल इन्फर्मेशन चुकीच्या कामांसाठी वापरत आहेत अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत.

    मुंबई, 8 फेब्रुवारी: इंटरनेट (Internet) हे आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य घटक झालेलं आहे. इंटरनेटचा वापर करणं हा एक प्रकारचा सौदाच आहे. जगाच्या पाठीवरील कोणत्याही गोष्टींबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रायव्हसीसोबत काही प्रमाणात तडजोड करावीच लागते. गुगलवरील अकाऊंट (Google Account) हे एक युजर (User) म्हणून तुमची ओळख (Identity) निश्चित केलेली असते. अशा प्रकारे ओळख तयार करण्यासाठी काही वैयक्तिक माहितीची (Personal Information) आवश्यक असते. मात्र, इंटरनेटवरील काही अनिष्ट प्रवृत्ती (malevolent) या पर्सनल इन्फर्मेशनला टार्गेट करत आहेत. काही उपद्रवी लोक युजर्सची पर्सनल इन्फर्मेशन चुकीच्या कामांसाठी वापरत आहेत अशी अनेक प्रकरणं समोर आल्यानंतर गुगलनं आपल्या युजर्सना त्यांच्या वैयक्तिक माहितीचं संरक्षण करण्यासाठी काही टूल्स देण्याचा निर्णय घेतला. उदाहरणार्थ, गुगल तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती लपवण्याची, कोणते बिट्स (bits) शो करायचे आणि कुठले नाही, यावर नियंत्रण ठेवण्याची परवानगी देतं. या लेखात आम्ही तुम्हाला तुमच्या गुगल अकाऊंटवरील (Google account) वैयक्तिक माहिती कशी लपवायची ते सांगणार आहोत. वाचा : 50 मेगापिक्सलचा 'हा' 5G स्मार्टफोन आजपासून मार्केटमध्ये, बंपर ऑफरमध्ये करा खरेदी गुगल अकाउंटवरील तुमची वैयक्तिक माहिती कशी लपवायची 1) तुमच्या गुगल अकाऊंटवरील ‘मॅनेज युवर गुगल अकाऊंट' (Manage Your Google Account) या ऑप्शनमध्ये जा. 2) त्यानंतर तुमची पर्सनल इन्फरमेशन ओपन करा आणि तिथे ‘Choose What Others See’ हा ऑप्शन शोधा. 3) या ऑप्शनमधील ‘About Me’ मध्ये जा आणि माहिती अ‍ॅड व एडिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेले ऑप्शन्स फॉलो करा. वाचा : Aadhaar Card शी असं लिंक करा तुमचं Ration Card, पाहा सोपी प्रोसेस 4) प्रत्येक माहितीच्या खाली, तुम्हाला सध्या तुमची माहिती कोण पाहू शकतं हे पाहण्याचा आणि बदलण्याचा ऑप्शन मिळेल. इन्फरमेशन प्रायव्हेट करण्यासाठी, 'Only You' हा ऑप्शन निवडा. तुम्हाला ही माहिती प्रत्येकासाठी व्हिजिबल ठेवायची असल्यास, ‘Everyone’ हा ऑप्शन निवडा. 5) जेव्हा तुम्ही पहिला ऑप्शन निवडता, तेव्हा फक्त तुम्हीच ती माहितीचा पाहू किंवा अ‍ॅक्सेस करू शकाल. टीप: तुमचे डिटेल्स किती महत्त्वाचे आहेत याच्या आधारावर प्रायव्हसी सेट करता येते. उदाहरणार्थ, फक्त तुमचं नाव जाणून घेतल्यानं एखादी व्यक्ती इंटरनेटवर तुमचं काहीही नुकसान करू शकत नाही. पण, जर तुमच्या कामाचं ठिकाण, तुमचा घराचा पत्ता, तुमचा फोन नंबर यासारखी माहिती एखाद्याला मिळाली तर तुम्ही स्कॅम्स (scams) आणि फिशिंग अ‍ॅटॅक्सला (Phishing Attacks) बळी पडू शकता. म्हणून, तुमची गुगल अकाऊंटवरील माहिती किती महत्त्वाची आहे हे निश्चित करून ती 'हाईड' किंवा 'शो' करा. वर दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या गुगल अकाऊंटवरील पर्सनल इन्फर्मेशन सिक्युअर करू शकता.
    First published:

    Tags: Google, Identity verification, Scam, Tech news, Technology

    पुढील बातम्या