मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, हॅकर्सकडून धोकादायक Malware तयार

कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, हॅकर्सकडून धोकादायक Malware तयार

या मालवेयरच्या मदतीने Android डिव्हाइसेस हॅक केले जाऊ शकतात. हा एक Remote Access Trojan (RAT) आहे. याद्वारे युजर्सचं लोकेशन, कॉन्टॅक्ट नंबर आणि कॉल हिस्ट्रीसह अनेक पर्सनल डिटेल्स चोरी करू शकतात.

नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी : एका नव्या हॅकिंग सॉफ्टवेयरचा खुलासा झाला आहे. भारतीय सेना आणि डिप्लोमॅट्स याच्या निशाण्यावर आहेत. मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, भारतीय सेनेचे जवान आणि डिप्लोमॅट्सला टार्गेट करणाऱ्या हॅकर्सच्या ग्रुपने CapraRAT नावाचं एक मालवेयर तयार केलं आहे.

या मालवेयरच्या मदतीने Android डिव्हाइसेस हॅक केले जाऊ शकतात. हा एक Remote Access Trojan (RAT) आहे. याद्वारे युजर्सचं लोकेशन, कॉन्टॅक्ट नंबर आणि कॉल हिस्ट्रीसह अनेक पर्सनल डिटेल्स चोरी करू शकतात.

या हॅकिंग सॉफ्टवेयरच्या मदतीने हॅकर्स युजर्सच्या फोनचा कॅमेरा आणि मायक्रोफोनही अॅक्सेस करू शकतात. याद्वारे माहिती चोरी केली जाऊ शकते. नव्या हॅकिंग टूलला सायबर सिक्योरिटी फर्म Trend Micro ने ओळखलं आहे. त्यांनी जानेवारी 2020 ते सप्टेंबर 2021 पर्यंत मिळालेल्या डेटाच्या आधारे ही माहिती दिली आहे. तसंच APT36 ला CapraRAT चा वापर करताना स्पॉट केलं असल्याची माहितीही फर्मने दिली आहे.

हा मालवेयर युजच्या डिव्हाइसपर्यंत पोहोचण्यासाठी फिशिंग लिंकची मदत घेतं. यापूर्वीही असाच एक मालवेयर समोर आला होता. त्यामुळे हा नवा मालवेयर आधीच्या मालवेयरचं मॉडिफाइड वर्जन असल्याचं सांगितलं जात आहे.

हे वाचा - Google Account वरील तुमची वैयक्तिक माहिती गुप्त कशी ठेवाल? वाचा स्टेप बाय स्टेप

रिपोर्टनुसार, हा मालवेयर टार्गेटच्या फोनपर्यंत पोहोचवण्यासाठी फेक सरकारी डॉक्युमेंट, हनीट्रॅप किंवा कोरोनासंबंधित एखादी माहितीच्या रुपात पोहोचवलं जातं. या गोष्टी डाउनलोड झाल्यानंतर इतर App प्रमाणे हेदेखील सिस्टम परमिशन मागतं. त्यानंतर हे सॉफ्टवेयर युजरचे पर्सनल डिटेल्स चोरू शकतो. या मालवेयरच्या मदतीने हॅकर्स युजर्सच्या फोनचं लोकेशन, कॉल हिस्ट्री, मायक्रोफोनचा अॅक्सेस आणि ऑडिओ क्लिपही रेकॉर्ड करू शकतात.

हे वाचा - Google Chrome युजर्ससाठी सरकराचा इशारा, प्लॅटफॉर्मचा वापर करणं ठरू शकतं धोक्याचं

त्यामुळे कोणत्याही अनोळखी नंबरवरुन आलेल्या लिंकवर क्लिक करू नका. फिशिंग लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या फोनचा अॅक्सेस हॅकरकडे जाण्याची शक्यता असते. तसंच तुमची पर्सनल माहिती कोणाशीही शेअर करू नका.

First published:
top videos

    Tags: Cyber crime, Malware, Online fraud