• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Electric car : ताशी 309km वेगाने धावणारी ही आहे भारतातली सर्वात वेगवान इलेक्ट्रीक कार

Electric car : ताशी 309km वेगाने धावणारी ही आहे भारतातली सर्वात वेगवान इलेक्ट्रीक कार

सध्या भारतासह जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मोठी क्रेझ निर्माण होत आहे. ओला कंपनीनं पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्यानंतर आता Vazirani Automotive कंपनीनं देशातील (fastest electric car in the India) सर्वात वेगवान कार लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : सध्या भारतासह जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मोठी क्रेझ निर्माण होत आहे. ओला कंपनीनं पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्यानंतर आता Vazirani Automotive कंपनीनं देशातील (fastest electric car in the India) सर्वात वेगवान कार लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंगल सीटर असणाऱ्या या कारचं नाव हे Ekonk असणार आहे. ही कार जगातील जलदगतीने वेग पकडणारी एकमेव इलेक्ट्रिक कार असल्याचा दावा ही कंपनीने केला आहे. दिसायला रिसींग किंवा स्पोर्ट्स कारसारखी दिसणारी ही कार 738 किलो वजनाची असणार आहे. यात कंपनीने नव्या इनोव्हेटिव बॅटरी सोल्यूशनचा वापर केलेला असल्यानं त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर कंपनीने (Vazirani Automotive) या कारसाठी DiCo टेक्नॉलॉजीचाही वापर केला आहे.

  तुम्ही खरेदी केलेली जुनी कार चोरीची तर नाही ना? कसं ओळखायचं?

  त्यामुळं या कारमध्ये बॅटरीला थंड ठेवण्याची क्षमता प्राप्त होणार आहे. वजीरानी कंपनीचा दावा आहे की या कारमध्ये (Ekonk electric car) नवीन टेक्नॉलॉजी वापरली गेल्यामुळं ही कार सुरक्षिततेसह हलकी असल्याने याचा ग्राहकांना फायदा होणार आहे. Facebook : भारतात फेसबुकचा झालाय 'फेक'बुक; या संस्थेची धक्कादायक माहिती एकॉन्क कारचं इन्जिन हे 722 hp क्षमता असलेलं आहे. या कारची संपूर्ण टेस्टिंग करण्यात आली असून ही कार प्रतितास 309 किलोमीटर वेगाने पळते. त्याचबरोबर या कारमध्ये 2.54 सेकंदात 100 किलोमीटर वेग पकडण्याची क्षमता आहे. त्यामुळं आता ग्राहक ही कार बाजारात कधी येणार याची प्रतिक्षा करत आहेत. Bank Money : चुकून दुसऱ्या बँक अकाऊंटमध्ये पैसे गेले तर...; असे मिळवा परत! याआधी टेस्ला कंपनीने इलेक्ट्रीक कार आणण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा त्या इलेक्ट्रीक कारची फार चर्चा झाली होती. त्यानंतर आता Vazirani Automotive ने सादर केलेल्या या Ekonk electric car ची टेस्लाच्या इलेक्ट्रीक कारसोबत तुलना केली जात आहे.
  Published by:Atik Shaikh
  First published: