• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Facebook : भारतात फेसबुकचा झालाय 'फेक'बुक; या संस्थेची धक्कादायक माहिती

Facebook : भारतात फेसबुकचा झालाय 'फेक'बुक; या संस्थेची धक्कादायक माहिती

फेसबुकवर सातत्यानं फेकन्यूज पसरवल्याचा आरोप लागतो. त्यामुळं फेसबुकच्या विश्वासार्हतेवर (Facebook is spreading false news in India) अनेकदा प्रश्नचिन्हं उपस्थित झालेलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : फेसबुकवर सातत्यानं फेकन्यूज पसरवल्याचा आरोप लागतो. त्यामुळं फेसबुकच्या विश्वासार्हतेवर (Facebook is spreading false news in India) अनेकदा प्रश्नचिन्हं उपस्थित झालेलं आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी भारतातील काही प्रसारमाध्यमांनीही याबाबतचे सखोल संशोधन करून फेसबुकवरील फेक न्यूज संदर्भातील एक रिपोर्ट जारी केला होता. परंतु आता जगभरातील काही वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या संशोधनात फेसबुक (Facebook ) हे फेकबुक बनलं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता पुन्हा एकदा फेसबुकच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होत आहे. हे संशोधन करणाऱ्या संस्थांमध्ये (Shocking revelations made by organizations) द न्यूयॉर्क टाइम्स चा ही समावेश आहे. त्याचबरोबर फेसबुकच्या माजी प्रॉडक्ट मॅनेजर फांसेस हॉजेन यांनी यासंदर्भात काही पुरावे गोळा केले असून त्या आधारावर त्या फेसबुकच्या काम करण्याच्या शैलीवर प्रश्नचिन्हं उपस्थित करत आहेत. त्यात विविध देशांत फेक न्यूज पसरवून त्या देशांतील निवडणूकांना प्रभावित केलं जात असल्याचा आरोप या संस्थांद्वारे फेसबुकवर केला जात आहे. Aadhaar द्वारे बँक खातं रिकामं होऊ शकतं? UIDAI ने दिली महत्त्वपूर्ण माहिती या घटनांची माहिती फेसबुक प्रशासनाला आहे. परंतु फेसबुकने याकडे कानाडोळा करत आहे. त्यामुळं आता प्रकारांना रोखण्यासाठी फेसबुककडे कुठलीही उपाययोजना नाही, हे प्रकार रोखण्यासाठी फेसबुकने 87 टक्क्यांचा खर्च केवळ अमेरिकेत केला असून त्यामुळं इतर देशांचं काय असाही प्रश्न या प्रकरणातून उपस्थित होत आहे. 1 नोव्हेंबरपासून या स्मार्टफोनमध्ये बंद होणार WhatsApp;यात तुमचा फोन तर नाही ना? याविषयी फेसबुकच्या प्रवक्त्या एंडी स्टोन यांनी म्हटलं आहे की भारतात अशा घटना सतत घडत असून त्यात फेसबुकवर फेकन्यूजचेही प्रमाण वाढत आहे. त्यामुळं आम्ही याला प्रकरणांना रोखण्यासाठी काम करत आहोत. फेसबुकला या प्रकरणांची माहिती असूनही यात फेसबुक कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीये कारण फेसबुकला संबंधित देशांमध्ये होणाऱ्या कारवाईची भीती वाटते. असं ही या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.
  Published by:Atik Shaikh
  First published: