मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Bank Money : चुकून दुसऱ्या बँक अकाऊंटमध्ये पैसे गेले तर...; असे मिळवा परत!

Bank Money : चुकून दुसऱ्या बँक अकाऊंटमध्ये पैसे गेले तर...; असे मिळवा परत!

अनेकवेळा आपण पेमेंट करत असताना आपल्याकडून चुकून दुसऱ्या अकाऊंटवर पैसे जातात. त्यावेळी आपल्याला प्रश्न पडतो की आता हे पैसे परत कसे मिळवायचे. त्यावेळी आपण आपल्या बँकेत कॉन्टॅक्ट करतो.

अनेकवेळा आपण पेमेंट करत असताना आपल्याकडून चुकून दुसऱ्या अकाऊंटवर पैसे जातात. त्यावेळी आपल्याला प्रश्न पडतो की आता हे पैसे परत कसे मिळवायचे. त्यावेळी आपण आपल्या बँकेत कॉन्टॅक्ट करतो.

अनेकवेळा आपण पेमेंट करत असताना आपल्याकडून चुकून दुसऱ्या अकाऊंटवर पैसे जातात. त्यावेळी आपल्याला प्रश्न पडतो की आता हे पैसे परत कसे मिळवायचे. त्यावेळी आपण आपल्या बँकेत कॉन्टॅक्ट करतो.

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : ऑनलाइन बँकिंग, फोन पे किंवा गूगल पे मुळं आपल्याला बँकेत न जाता इतरांना पैसे पाठवणं काही सेकंदात सहज शक्य होत आहे. विशेष म्हणजे आता भारतात अशा प्रकारच्या ऑनलाइन व्यवहारांची (bank account) संख्या वाढताना दिसत आहे. परंतु अनेकवेळा आपण पेमेंट करत असताना आपल्याकडून चुकून दुसऱ्या (money accidentally transferred to another bank account) अकाऊंटवर पैसे जातात. त्यावेळी आपल्याला प्रश्न पडतो की आता हे पैसे परत कसे मिळवायचे. त्यावेळी आपण आपल्या बँकेत कॉन्टॅक्ट करतो.

परंतु आता आपण सहज आपल्या खात्यावरून दुसऱ्यांच्या खात्यात चुकून गेलेले पैसे रिकव्हर करू शकतो. त्यासाठी कोणत्या ट्रिक्स आहेत ते आपण पाहुयात. असा कुठला व्यवहार तुमच्याकडून चुकून झाला असेल तर त्याची माहिती सर्वप्रथम आपल्या बँकेला द्यायला हवी. त्यासाठी बँकेच्या (recover the amount tricks)  कर्मचाऱ्यांना फोन करून किंवा ईमेल करून आपली तक्रार नोंदवायला हवी. जर शक्य असेल तर त्यावेळी बँकेच्या मॅनेजरला भेटून तक्रार नोंदवणं हे कधीही उत्तम ठरतं.

Smart Phone Problem : गूगल पिक्सलचा हा स्मार्टफोन निघाला 'चायनीज माल'

त्यावेळी झालेल्या व्यवहाराच्या डिटेल्स म्हणजेच व्यवहाराची वेळ, आपलं नाव, अकाऊंट नंबर आणि झालेल्या व्यवहाराची आयडी आपण बँकेच जमा केल्यावर त्यावर बँकेकडून तात्काळ कारवाईही व्हायला हवी. कारण नाही तर चुकून गेलेल्या खात्यावरील खातेदाराने ते पैसे काढले तर ही प्रक्रिया अजून कठिण होत जाते.

तुमच्या आधार कार्डसोबत किती नंबर आहेत लिंक; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

अशा प्रकरणांमध्ये अनेकदा रक्कम तक्रारदाराला परत मिळते. परंतु जर संबंधित खातेदाराने पैसे द्यायला नकार दिला तर त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचाही पर्याय तक्रारदाराकडे असतो. अशा प्रकरणांमध्ये आरबीआयच्या गाइडलाइन्सनुसार एखाद्या ग्राहकासोबत अशी घटना घडली असेल तर त्यावर बँकेने तात्काळ अॅक्शन घेऊन तक्रारदाराला त्याची रक्कम परत मिळवून द्यायला हवी. त्यामुळं ही तक्रार तक्राकदाराने लवकरात लवकर बँकेच्या अधिकाऱ्यांकडे केली तर त्यावर बँकेकडून तोडगा काढला जातो.

PhonePe युजर्सला मोठा झटका, आता मोबाइल रिचार्ज करणं महागणार

ऑनलाइन व्यवहार करताना या गोष्टींची घ्या काळजी :

व्यवहार करताना आपण ज्या अकाऊंटवर पैसे पाठवत आहोत त्या अकाऊंट नंबरला रिेचेक करा.

व्यवहार करताना सर्व नंबर्स योग्य आहेत का याची खात्री करा.

एकदा पैसे पाठवले तर संबंधिताचा अकाऊंट नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करा.

व्यवहार करताना सुरूवातीलाच मोठी रक्कम पाठवू नका. त्यासाठी आधी थोडीथोडी रक्कम टाकून खात्री करून घ्या.

First published:

Tags: Money debt, Money fraud, बँक