मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

तुम्ही खरेदी केलेली जुनी कार चोरीची तर नाही ना? कसं ओळखायचं?

तुम्ही खरेदी केलेली जुनी कार चोरीची तर नाही ना? कसं ओळखायचं?

खबरदारी न बाळगता गाडी खरेदी केली आणि ती गाडी चोरीची असेल, तर ती खरेदी करणारी व्यक्ती गुन्हेगार ठरू शकते.

खबरदारी न बाळगता गाडी खरेदी केली आणि ती गाडी चोरीची असेल, तर ती खरेदी करणारी व्यक्ती गुन्हेगार ठरू शकते.

खबरदारी न बाळगता गाडी खरेदी केली आणि ती गाडी चोरीची असेल, तर ती खरेदी करणारी व्यक्ती गुन्हेगार ठरू शकते.

मुंबई, 25 ऑक्टोबर : आपली स्वतःची गाडी असावी, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं; मात्र त्यामुळे नवी गाडी खरेदी करणं प्रत्येकालाच शक्य असतं असं नाही. अनेक जण काम निभावून घेण्यासाठी सेकंड हँड (second hand car) गाडी खरेदी करत असतात. तसंच सेकंड हँड गाडी स्वस्त मिळत असेल, तर त्या आनंदात त्या गाडीची जास्त चौकशीही केली जात नाही; मात्र हे चांगलंच महागात पडू शकतं. कारण, तुम्ही खरेदी करत असलेली गाडी चोरीचीही असू शकते. त्यामुळे जुनी गाडी खरेदी करताना ती चोरीची तर नाही ना, याची खबरदारी घेणं गरजेचं आहे.

सेकंड हँड गाडी खरेदी करताना नागरिकांना मदत व्हावी यासाठी नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्यूरोने (National Crime Records Bureau) कॉमन सर्व्हिस सेंटरशी (Common Service Centres) करार केला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत कॉमन सर्व्हिस सेंटर काम करतं. नवी गाडी खरेदी करताना तुम्ही आपल्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला जाऊन खरेदी केलेल्या वाहनाशी संबंधित ना हरकत प्रमाणपत्र (Non objection certificate) घेऊ शकता. सेकंड हँड गाडी खरेदी करणाऱ्या व्यक्तीला संबंधित गाडीची संपूर्ण माहिती कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे दिली जाते. नागरिकांना एनओसी मिळण्यास मदत होते, असं वृत्त टीव्ही ९ हिंदीने दिले आहे.

T20 World Cup : मुजीब-राशिदचा कहर, अफगाणिस्तानचा स्कॉटलंडवर सगळ्यात मोठा विजय

चोरीची गाडी विकत घेणं हा गुन्हा आहे. त्यामुळे चोरीची गाडी खरेदी करणारा कायद्याच्या कचाट्यात अडकल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे पूर्णपणे तपासून, योग्य कागदपत्रं असल्याशिवाय जुन्या गाड्या खरेदी करू नयेत; मात्र अनेकांना याबाबतची माहिती नसते. बहुतांश जण फारशी काही चौकशी न करता गाडी खरेदी करतात आणि भूलथापा किंवा आमिषाला बळी पडतात. अनेक जण एनसीआरबीकडून एनओसी न घेता सेकंड हँड गाडी खरेदी करतात. अशा वेळी फसवणूक होण्याची शक्यता असते.

Apple Shape: सफरचंदाचा आकार का असतो असा? जाणून घ्या मजेशीर Facts

एनसीआरबीने सर्व राज्य सरकारांना डिजिटल सेवा पोर्टलसोबत (Digital Seva Portal) सीएससी सेवा एकीकृत करण्यास सांगितलं आहे, जेणेकरून ही सेवा सर्वत्र उपलब्ध होईल आणि नागरिक सहजपणे याचा वापर करू शकतील. खरेदी केलेल्या गाडीची हस्तांतरण कागदपत्रं तयार करण्यापूर्वी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) घेतल्यास संबंधित गाडी यापूर्वी काही कायदेशीर प्रकरणात अडकलेली नव्हती ना, याची माहिती मिळते. खबरदारी न बाळगता गाडी खरेदी केली आणि ती गाडी चोरीची असेल, तर ती खरेदी करणारी व्यक्ती गुन्हेगार ठरू शकते. त्यामुळे गाडी खरेदी करताना विशेष लक्ष द्यायला हवं. नाही तर हे अंगलट येऊ शकतं.

First published: