नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : फ्रान्सची ऑटोमेकर कंपनी Renault आपला दहावा वर्धापन दिन (Renault 10 years celebration) साजरा करत आहे. Renault India ने या निमित्ताने खास ऑफर्सची घोषणा केली आहे. या ऑफरअंतर्गत कोणतीही कार खरेदी केल्यास, त्याचं पेमेंट 2022 मध्ये करता येणार आहे. म्हणजेच आता कार खरेदी करुन त्या कारचं पेमेंट पुढच्या वर्षी 2022 मध्ये करण्याची सुविधा मिळणार आहे. त्याशिवाय Renault आपल्या कार्सवर 49,999 रुपयांचं गिफ्ट व्हाउचर आणि 95 हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त लॉयल्टी बेनिफिस्ट्स देणार आहे.
Renault Kwid -
या कारवर कंपनीकडून 40 हजार रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत. ज्यात कंपनी कॅश डिस्काउंट, कॉर्पोरेट डिस्काउंट आणि लॉयल्टी बोनस देत आहे. Renault च्या या हॅचबॅक कारमध्ये 0.80 L 3-cylinder आणि 1.0 L 3-cylinder इंजिन देण्यात आलं आहे. या कारची एक्स शोरुम सुरुवातीची किंमत 4 लाख 6 हजार रुपये आहे.
Renault Kiger -
या मिड साइज कॉम्पॅक्ट SUV ची एक्स शोरुम सुरुवातीची किंमत 5 लाख 64 हजार रुपये आहे. कंपनीकडून या कारवर मिळणाऱ्या बेनिफिस्ट्सबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या SUV मध्ये 1.0 L Turbocharged पेट्रोल इंजन देण्यात आलं आहे.
Renault Triber -
Renault आपल्या या MPV Triber वर 60 हजार रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स देत आहे. या MPV ची एक्स शोरुम सुरुवातीची किंमत 5 लाख 50 हजार रुपये आहे. या कारला कंपनीने 1.0 L 3-cylinder इंजिन दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car