मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Yamaha च्या R15 V4 आणि R15 M Sports Bikes भारतात लाँच, पाहा काय आहे किंमत आणि फीचर्स

Yamaha च्या R15 V4 आणि R15 M Sports Bikes भारतात लाँच, पाहा काय आहे किंमत आणि फीचर्स

Yamaha ने आपल्या R15 V4 आणि R15 M या दोन स्पोर्ट्स बाईक्स (Yamaha Sports Bikes) भारतात दाखल केल्या आहेत. Yamaha च्या 155 cc स्पोर्टस बाईक श्रेणीतील या दोन अत्याधुनिक बाईक्स आहेत.

Yamaha ने आपल्या R15 V4 आणि R15 M या दोन स्पोर्ट्स बाईक्स (Yamaha Sports Bikes) भारतात दाखल केल्या आहेत. Yamaha च्या 155 cc स्पोर्टस बाईक श्रेणीतील या दोन अत्याधुनिक बाईक्स आहेत.

Yamaha ने आपल्या R15 V4 आणि R15 M या दोन स्पोर्ट्स बाईक्स (Yamaha Sports Bikes) भारतात दाखल केल्या आहेत. Yamaha च्या 155 cc स्पोर्टस बाईक श्रेणीतील या दोन अत्याधुनिक बाईक्स आहेत.

  नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : कोरोना साथीमुळे थंडावलेल्या अनेक उद्योगांना पुन्हा काही प्रमाणात चालना मिळाली असून, मोठ्या फटका बसलेल्या वाहन, रिअल इस्टेट क्षेत्रातही उलाढाल सुरू झाली आहे. नवी Four Wheelers आणि Two Wheelers मार्केटमध्ये लाँच होत आहेत. सध्या इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढलेला दिसत आहे. भारतीय बाजारपेठेत स्पोर्ट्स बाईक्सचा ग्राहक वर्गही मोठा आहे. त्यामुळे या ग्राहक वर्गासाठी नवीन बाईक्स (New Bike) आणण्यावर वाहन कंपन्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे. याच पार्श्वभूमीवर Yamaha या आघाडीच्या दुचाकी वाहन कंपनीने आपल्या R15 V4 आणि R15 M या दोन स्पोर्ट्स बाईक्स (Yamaha Sports Bikes) भारतात दाखल केल्या आहेत. Yamaha च्या 155 cc स्पोर्टस बाईक श्रेणीतील या दोन अत्याधुनिक बाईक्स असून, R15 V4 या बाईकची किंमत 1.68 लाख रुपये आणि R15 M ची किंमत 1.78 लाख रुपये आहे.

  2018 च्या ऑटो एक्सपोमध्ये दाखल केलेल्या R15 च्या V3 नंतर Yamaha ने दाखल केलेल्या या बाईक्स आहेत. नवीन R15 V4 बाईकमध्ये नव्याने डिझाइन केलेले LED Projector Headlight आणि upside-down fork देण्यात आलं आहेत. त्याचप्रमाणे digital instrument cluster हे याचं खास वैशिष्ट्य आहे. यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देण्यात आली असून, याद्वारे रायडरच्या स्मार्टफोनवर SMS आणि कॉल अलर्ट रिले करता येतो. R15 V4 रेड, डार्क नाइट आणि रेसिंग ब्लू अशा तीन रंगामध्ये उपलब्ध असून, त्यानुसार तिच्या किंमतीत थोडा फरक आहे.

  Ola Electric Scooter: Ola E-scooter ची विक्री सुरू, इतक्या EMI वर खरेदी करता येणार

  Yamaha च्या R15 M ही बाईक V3 मॉडेलसारखीच असून, ती एकाच रंगसंगतीमध्ये उपलब्ध आहे. 155 cc क्षमतेची सिंगल-सिलिंडर इंजिन असलेली ही बाईक 18.4 hp आणि 14.2 Nm टॉर्क देते. यात डेल्टाबॉक्स फ्रेमप्रमाणे (Deltabox frame) सहा-स्पीड गिअरबॉक्स (Speed Gear box) असून, slip-and-assist clutch आणि ड्युअल-चॅनेल एबीएस सिस्टीमही (dual-channel ABS System) आहे. R15 M बाईकमध्ये सीटसाठी अधिक ग्रिप असणारे मटेरियल वापरण्यात आलं असून, 3D emblem आणि Bybre brake callipers  आहेत. या बाईकमध्ये क्विक-शिफ्टर आणि ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (Traction Control System) देण्यात आली आहे. R15 V4 मध्ये या सिस्टम्स ऑप्शनल आहेत.

  Suzuki ची ही Electric Scooter लवकरच होणार लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

  या नवीन बाईक्सचे आकर्षक डिझाइन आणि वैशिष्ट्यपूर्ण सिस्टम्स तरुणाईला नक्कीच भुरळ घालतील. त्यामुळे या बाइक्सची मोठ्या प्रमाणात विक्री होईल अशी आशा कंपनीला आहे. सणासुदीच्या काळातच या बाइक्स दाखल झाल्याने तरुणाईला सुवर्णसंधीच आहे.

  First published:
  top videos