मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Driving वेळी ट्रॅफिक नियम मोडला? कसं समजेल तुमचं चालान कापलं की नाही; इथे चेक करा तुमचं e-challan

Driving वेळी ट्रॅफिक नियम मोडला? कसं समजेल तुमचं चालान कापलं की नाही; इथे चेक करा तुमचं e-challan

एखाद्या चालकाने ट्रॅफिक नियम मोडला, तर CCTV कॅमेरे गाडी स्कॅन करतात आणि चालकाला त्याचं चालान ऑनलाईन पोर्टलवर पाठवतात. तुम्हाला कसं समजेल तुमचं चालान कापलं आहे की नाही?

एखाद्या चालकाने ट्रॅफिक नियम मोडला, तर CCTV कॅमेरे गाडी स्कॅन करतात आणि चालकाला त्याचं चालान ऑनलाईन पोर्टलवर पाठवतात. तुम्हाला कसं समजेल तुमचं चालान कापलं आहे की नाही?

एखाद्या चालकाने ट्रॅफिक नियम मोडला, तर CCTV कॅमेरे गाडी स्कॅन करतात आणि चालकाला त्याचं चालान ऑनलाईन पोर्टलवर पाठवतात. तुम्हाला कसं समजेल तुमचं चालान कापलं आहे की नाही?

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : कोरोना काळापासून अनेक काम घरातून ऑनलाईन सुरू आहेत. परिवहन विभागानेही चालकांना चालान (challan) घरातूनच ऑनलाईन भरण्याची सुविधा दिली आहे. परिवहन मंत्रालयाने ट्रॅफिक नियम आधीच्या तुलनेत अधिक कठोर केले आहेत. चालकाने ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन करू नये यासाठी सरकारने रस्त्यांलगत अनेक CCTV कॅमेरे लावले आहेत. जर एखाद्या चालकाने ट्रॅफिक नियम मोडला, तर हे कॅमेरे गाडी स्कॅन करतात आणि चालकाला त्याचं चालान ऑनलाईन पोर्टलवर पाठवतात. तुम्हाला कसं समजेल तुमचं चालान कापलं आहे की नाही?

तुमच्या गाडीच्या Number Plate बाबतचं हे काम झालं का? नसेल तर वाढू शकतात अडचणी

- सर्वात आधी echallan.parivahan.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल.

- त्यानंतर वेबसाईटवर Check चालान या पर्यायावर क्लिक करा.

- त्यानंतर स्क्रिनवर तीन ऑप्शन येतील. वाहन नंबर, चालान नंबर आणि ड्रायव्हिंग लायसन्स नंबर दिसतील.

- या तीन पर्यायांपैकी वाहन नंबरवर क्लिक करावं लागेल.

- वाहन नंबर क्लिक केल्यानंतर वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल.

- त्यानंतर स्क्रिनवर Captcha Code येईल, तो भरुन Get Details वर क्लिक करा.

- इथे संपूर्ण माहिती मिळेल, की तुमचं चालान कापलं आहे की नाही.

लय भारी! 9 वीतल्या मुलानं भंगारातल्या बुलेटपासून तयार केली इलेक्ट्रिक बाईक

कसं कराल पेमेंट?

- चालान ऑनलाईन जमा करण्यासाठी चालानच्या पुढे दिलेल्या Pay Now वर क्लिक करा.

- त्यानंतर मोबाईलवर एक OTP येईल.

- त्यानंतर राज्याची ई-चालान पेमेंट वेबसाईट स्क्रिनवर ओपन होईल. इथे Next वर क्लिक करा.

- नेक्स्ट केल्यानंतर स्क्रिनवर पेमेंट कन्फर्मेशनचं पेज ओपन होईल.

- इथे प्रोसीड बटणावर क्लिक करावं लागेल.

- त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करावं लागेल. यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगचा वापर करू शकता.

- पेमेंट कन्फर्म झाल्यानंतर चालान जमा होईल आणि याचा मेसेजही तुम्हाला येईल.

First published:
top videos

    Tags: Driving license, While driving