मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Jio युजर्ससाठी जबरदस्त ऑफर, या Recharge Plans वर मिळेल 20 टक्के Cashback

Jio युजर्ससाठी जबरदस्त ऑफर, या Recharge Plans वर मिळेल 20 टक्के Cashback

कंपनी आपल्या काही निवडक रिचार्ज प्लॅनसह 20 टक्के कॅशबॅक ऑफर करत आहे. MyJio App किंवा जिओच्या अधिकृत वेबसाइटवरुन रिचार्ज केल्यावरच हा कॅशबॅक मिळेल

कंपनी आपल्या काही निवडक रिचार्ज प्लॅनसह 20 टक्के कॅशबॅक ऑफर करत आहे. MyJio App किंवा जिओच्या अधिकृत वेबसाइटवरुन रिचार्ज केल्यावरच हा कॅशबॅक मिळेल

कंपनी आपल्या काही निवडक रिचार्ज प्लॅनसह 20 टक्के कॅशबॅक ऑफर करत आहे. MyJio App किंवा जिओच्या अधिकृत वेबसाइटवरुन रिचार्ज केल्यावरच हा कॅशबॅक मिळेल

नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : Reliance Jio आपल्या ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स जाहीर करत असतं. आता कंपनीने आपल्या प्रीपेड युजर्ससाठी जबरदस्त ऑफर आणली आहे. कंपनी आपल्या काही निवडक रिचार्ज प्लॅनसह 20 टक्के कॅशबॅक ऑफर करत आहे. MyJio App किंवा जिओच्या अधिकृत वेबसाइटवरुन रिचार्ज केल्यावरच हा कॅशबॅक मिळेल. टेलिकॉम ऑपरेटर कॅशबॅक युजर्सच्या Jio Account मध्ये जमा करेल, याचा वापर पुढील रिचार्जवेळी करता येऊ शकतो.

Jio ची ही कॅशबॅक ऑफर केवळ तीन प्लॅनवर लागू आहे. हे प्लॅन 249 रुपये, 555 रुपये आणि 599 रुपये आहेत. या प्लॅनची वॅलिडिटी 84 दिवस असून दररोज 2GB हाय स्पीड डेटा मिळतो.

BSNL Plans vs Jio: या प्लॅन्समध्ये 1100 रुपयांचे अंतर,काय आहे बेनिफिट्समधील फरक

249 रुपये प्लॅन -

जिओच्या या 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये Reliance Jio कडून कॅशबॅक ऑफर केला जात आहे. या प्लॅनमध्ये रोज 2GB डेटासह 28 दिवसांची वॅलिडिटी मिळते. कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आणि दररोज 100 SMS मिळतात.

1 रुपयात घरबसल्या पोर्ट करता येणार Mobile Number, SIM Card बाबत नवा नियम जारी

555 रुपये प्लॅन -

Jio च्या या प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सला 20 टक्के कॅशबॅक दिला जाणार आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB डेटा मिळतो. याची वॅलिडिटी 84 दिवस आहे. त्याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS ची सुविधा मिळते.

Airtel Alert! कॉलवर चुकूनही करू नका ही चूक, फसवणुकीची व्हाल शिकार

599 रुपये प्लॅन -

599 रुपये प्रीपेड प्लॅनमध्ये 20 टक्के कॅशबॅक आहे. यात दररोज 2GB डेटासह 84 दिवसांची वॅलिडिटी मिळते. या प्लॅनमध्ये एकूण 168GB डेटा आणि 100 SMS मिळतात.

First published:
top videos

    Tags: Recharge, Reliance Jio, Reliance Jio Internet, Tech news