Home /News /money /

Airtel Alert! कॉलवर चुकूनही करू नका ही चूक, फसवणुकीची व्हाल शिकार

Airtel Alert! कॉलवर चुकूनही करू नका ही चूक, फसवणुकीची व्हाल शिकार

देशातील दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी असणाऱ्या एअरटेलने (Airtel Alert to its customer) त्यांच्या ग्राहकांना अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी महत्त्वाचा अलर्ट पाठवला आहे.

    मुंबई, 26 सप्टेंबर: मोबाइल युजर्सची फसवणूक करण्यासाठी भामट्यांकडून विविध मार्ग अवलंबले जातात. फेक मेसेज करून, मेलच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक केली जाते आणि त्यांना लुबाडले जाते. देशातील दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी असणाऱ्या एअरटेलने (Airtel Alert to its customer) त्यांच्या ग्राहकांना अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी महत्त्वाचा अलर्ट पाठवला आहे. एअरटेल युजर्सना केवायसी  (Airtel KYC Update) संदर्भात पाठवण्यात येणाऱ्या एसएमएसबाबत कंपनीने सावध केले आहे. एअरटेलने ग्राहकांना एक मेसेज पाठवून सावध केले आहे. Airtel ने काय पाठवला मेसेज? एअरटेलने पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटलं आहे की, 'अलर्ट! एअरटेल कधी 10 अंकी मोबाइल क्रमांकावरुन तुमच्या अकाउंट/सिम अपडेटसाठी केवायसीसंदर्भात SMS करत नाही. अशा फसवणुकीपासून सावध राहा आणि कॉलवर कधीही ओटीपी/कोड शेअर करू नका'. हे वाचा-गुंतवणुकीसाठी व्हा सज्ज! आता ही कंपनी देखील बाजारात IPO आणण्याच्या तयारीत वापरा एअरटेलची DND सेवा तुम्हाला अनावश्यक कॉल्सपासून वाचायचे असेल तर तुम्ही एअरटेलची डीएनडी सर्व्हिस वापरू शकता. ही सेवा तुम्हाला अॅक्टिव्हेट करावी लागेल. यानंतर तुम्हाला नको असलेले मेसेज आणि कॉल्स येणार नाहीत. ही सेवा तुम्ही SMS, कॉल किंवा टेलिकॉम कंपनीच्या वेबसाइटचा वापर करून अॅक्टिव्ह करू शकता. अशाप्रक्रारे अ‍ॅक्टिव्ह करा DND सेवा- वेबसाइटचा वापर करून- ऑनलाइन ही सेवा अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी Do Not Disturb पेजवर क्लिक करा. यानंतर एअरटेल मोबाइल सर्व्हिसमध्ये दिसणाऱ्या Click here बटणावर क्लिक करा. याठिकामी तुमचा क्रमांक प्रविष्ट करा. यानंतर तुम्हाला ओटीपी येईल, तो त्याठिकाणी एंटर करा. यानंतर स्टॉप ऑलवर क्लिक करून सबमिटवर क्लिक करा हे वाचा-महत्त्वाचे: Aadhaar Card च्या साहाय्याने मिळवा पर्सनल लोन, फॉलो करा या स्टेप्स SMS किंवा कॉलवरून अशाप्रकारे करा अ‍ॅक्टिव्ह- 1909 या क्रमांकावर कॉल करून तुम्ही डीएनडी सेवा सक्रीय करू शकता. याशिवाय तुम्ही SMS द्वारे देखील हे काम करू शकता. त्याकरता तुम्हाला START 0 लिहून 1909 या क्रमांकावर पाठवावे लागेल. त्यानंतर जवळपास 7 दिवसांमध्ये ही सेवा अॅक्टिव्ह होईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Airtel

    पुढील बातम्या