मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

BSNL Plans vs Jio Plans: दोन्ही कंपनींच्या या प्लॅन्समध्ये 1100 रुपयांचे अंतर, काय आहे स्पीड आणि बेनिफिट्समधील फरक

BSNL Plans vs Jio Plans: दोन्ही कंपनींच्या या प्लॅन्समध्ये 1100 रुपयांचे अंतर, काय आहे स्पीड आणि बेनिफिट्समधील फरक

ग्राहकांसाठी बीएसएनएलनं एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आणि जास्त बेनिफिटसचे प्लॅन्स लॉन्च केले आहेत. यातून बीएसएनएलच्या ग्राहकांना रिचार्ज कालावधी संपला तरी कमी स्पीडनं का होईना; पण अनलिमिटेड डेटा सुविधा मिळू शकणार आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर: सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या अनेक नवनवीन प्लॅन्स लॉन्च करत आहेत. यातून ग्राहक संख्या वाढावी हा संबंधित कंपनीचा उद्देश असतो. मोबाईल कंपन्यांकडून प्लॅन्सव्दारे देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये प्रामुख्याने कॉलिंग, डेटा आणि एसएमएसचा समावेश असतो. मात्र ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आता यात ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या (OTT Platform) सबस्क्रिप्शनचाही समावेश करण्यात आला आहे. खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या अशा स्पर्धेत आता सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलही (BSNL) उतरली आहे. बीएसएनएलची देखील युजर्स संख्या मोठी आहे. बीएसएनएलच्या काही वैशिष्टयपूर्ण प्लॅन्सचा वापर करणारे ग्राहकही मोठ्या प्रमाणावर आहेत.

आपल्या ग्राहकांसाठी बीएसएनएलनं एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आणि जास्त बेनिफिटसचे प्लॅन्स लॉन्च केले आहेत. यातून बीएसएनएलच्या ग्राहकांना रिचार्ज कालावधी संपला तरी कमी स्पीडनं का होईना; पण अनलिमिटेड डेटा सुविधा मिळू शकणार आहे. त्यासोबतच इरॉस नाउ (EROS Now) या ओटीटी प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे. बीएसएनएल आणि जिओच्या प्लॅन्सची तुलना करून कोणत्या प्लॅनमधून जास्त बेनिफिटस मिळतात, हे आपण जाणून घेणार आहोत. दोन्ही कंपन्यांकडे 3GB दैनंदिन डेटाचे प्लॅन उपलब्ध आहेत. परंतु, किंमत आणि बेनिफिटसमध्ये खूपच फरक दिसून येतो. हा फरक कसा आहे हे सविस्तर जाणून घेऊया

IPL सामन्यादरम्यान Paytm वरून 100% कॅशबॅक मिळवण्याची संधी, करावं लागेल हे काम

जिओचा 3499 रूपयांचा प्लॅन

जिओच्या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा 365 दिवसांच्या कालावधीकरिता मिळतो. याचाच अर्थ या प्लॅनमध्ये एकूण 1095 GB डेटा मिळेल. तसेच दररोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची (Voice Calling) सुविधा मिळेल. या प्लॅनसोबत युजर्सला केवळ जिओ सिनेमा, जिओ टिव्हीसह जिओ अॅप्सचा (Jio Apps) अॅक्सेस मोफत मिळेल.

बीएसएनएलचा 2399 रूपयांचा प्लॅन

बीएसएनएल प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सला 425 दिवसांचा कालावधी मिळेल. जिओच्या प्लॅनच्या तुलनेत हा कालावधी 60 दिवसांनी अधिक आहे. युजर्सला एकूण 1275 GB डेटा मिळेल. म्हणजेच दररोज 3GB डेटा उपलब्ध होईल. युजर्सला ओटीटी सुविधाही दिली जाईल. या प्लॅन अंतर्गत इरॉस नाउ ओटीटीचा बेनिफिट (Benefit) दिला जातो. यात युजर्सला कॉलर ट्यून बदलण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे.

IPL 2021 : Vodafone Idea ग्राहकांना लॅपटॉप, बाइक, मोफत दुबई फिरण्याची संधी

डेटा स्पीड

डेटा संपला तरीही बीएसएनएलचे युजर्स 80 kbps स्पीड असलेला डेटा वापरू शकतात. दुसरीकडं जिओ युजर्सला डेटा लिमिट संपल्यानंतर 64 kbps स्पीडनं डेटा उपलब्ध होऊ शकतो. असा फरक या दोन्ही कंपन्यांच्या प्लॅन्समध्ये आहे.

First published:

Tags: BSNL, Reliance Jio