मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Jio चा सर्वात स्वस्त Recharge, केवळ 10 रुपयांत वापरता येणार सर्व सुविधा; पाहा डिटेल्स

Jio चा सर्वात स्वस्त Recharge, केवळ 10 रुपयांत वापरता येणार सर्व सुविधा; पाहा डिटेल्स

जिओ युजर्ससाठी (Jio) 10 रुपयांचा रिचार्ज फायदेशीर ठरू शकतो. Jio 10 रुपयांत टॉपअप ऑफर करतं.

जिओ युजर्ससाठी (Jio) 10 रुपयांचा रिचार्ज फायदेशीर ठरू शकतो. Jio 10 रुपयांत टॉपअप ऑफर करतं.

जिओ युजर्ससाठी (Jio) 10 रुपयांचा रिचार्ज फायदेशीर ठरू शकतो. Jio 10 रुपयांत टॉपअप ऑफर करतं.

नवी दिल्ली, 12 मे : भारतीय टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये मागील काही वर्षात अनेक बदल झाले. आधी 4 रुपयांत येणारा छोटा रिचार्ज आता इतिहासजमा झाला आहे. आता कंपन्या 10 रुपयांचा रिचार्ज ऑफर करतात. परंतु 10 रुपयाच्या रिचार्जमध्ये काय मिळतं असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण जिओ युजर्ससाठी (Jio) 10 रुपयांचा रिचार्ज फायदेशीर ठरू शकतो. Jio 10 रुपयांत टॉपअप ऑफर करतं.

टॉप-अप देखील एक रिचार्जच आहे. जिओ आपल्या ग्राहकांना प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्लॅन ऑफर करतं. जर तुम्ही प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओ घेत असाल, तर यात कंपनी क्रिकेट प्लॅन, 4G डेटा व्हाउचर, टॉप-अप, अॅन्युअल प्लॅनसह अनेक रिचार्ज ऑफर करतं. याचप्रमाणे एक 10 रुपयांचा रिचार्जही येतो.

हे वाचा - तुमच्या फोनमध्ये तुमच्या नकळत कोणी काय पाहिलं? या Code ने मिळेल माहिती

Jio 10 रुपये रिचार्ज -

Jio च्या या रिचार्जमध्ये युजरला 7.47 रुपयांचा टॉक टाइम मिळतो. या मदतीने तुम्ही डेटा, कॉलिंग आणि SMS या तीन सेवा वापरू शकता. 2016 पासून टॉक टाइम शब्द प्रचलित आहे. त्यावेळी अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री डेटा सारख्या सुविधा नव्हत्या. युजर्सला टॉक टाइम खर्च करुन फोनवर बोलावं लागत होतं. आजही या सुविधा टेलिकॉम कंपन्या ऑफर करतात.

हे वाचा - हे 4 अंक लक्षात ठेवा, Cyber Crime झाल्यास लगेच करा डायल; पैसे परत मिळण्यास होईल मदत

10 रुपयांच्या Jio च्या रिचार्जप्रमाणे कंपनी इतर 20 रुपये, 50 रुपये आणि 100 रुपयांचा टॉप-अप ऑफर करते. यात 20 रुपयांच्या रिचार्जमध्ये 14.95 रुपये, 50 रुपयांच्या रिचार्जमध्ये 39.37 रुपये आणि 100 रुपयांच्या रिचार्जमध्ये 81.75 रुपयांचा टॉक टाइम मिळतो. टॉक टाइमचा वापर तुम्ही इंटरनॅशनल सर्विसेस वापरण्यासाठीही करू शकता. कंपनी 500 आणि 1000 रुपयांचाही टॉप-अप ऑफर करते. हे टॉप-अप रिचार्ज तुम्ही कोणत्याही वॅलिडिटी प्लॅनप्रमाणे वापरु शकत नाहीत.

First published:
top videos

    Tags: Reliance Jio, Reliance Jio Internet, Tech news