Home /News /technology /

हे 4 अंक लक्षात ठेवा, Cyber Crime झाल्यास लगेच करा डायल; पैसे परत मिळण्यास होईल मदत

हे 4 अंक लक्षात ठेवा, Cyber Crime झाल्यास लगेच करा डायल; पैसे परत मिळण्यास होईल मदत

Cyber fraud helpline number: गृह मंत्रालयकडून सायबर फ्रॉडसंबंधी नवा हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. 1930 या क्रमांकावर तुम्ही तुमच्या ऑनलाइन फ्रॉड, सायबर क्राइमसंबंधी तक्रारी नोंदवू शकता.

  नवी दिल्ली, 12 मे : इंटरनेटचा वापर जसा वाढतो आहे, त्याच वेगात सायबर फ्रॉडची (Cyber Fraud) प्रकरणंही वाढत आहेत. सायबर क्रिमिनल्स नव्या नव्या पद्धतींनी लोकांची फसवणूक करत आहेत. बँकेपासून ते अनेक फायनेंशियल सर्विस देणाऱ्या कंपन्या आणि सरकार वेळोवेळी लोकांना ऑनलाइन फ्रॉडबाबत अलर्ट राहण्याचं सांगत आहे. गृह मंत्रालयकडून सायबर फ्रॉडसंबंधी नवा हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. आधी हेल्पलाइन नंबर 155260 असा होता. परंतु आता बदलून तो 1930 करण्यात आला आहे. 1930 या क्रमांकावर तुम्ही तुमच्या ऑनलाइन फ्रॉड, सायबर क्राइमसंबंधी तक्रारी नोंदवू शकता. त्याशिवाय सायबर क्राइम वेबसाइट www.cybercrime.gov.in वरही तक्रार दाखल करू शकता. 1930 हा एक इमरजेन्सी नंबरप्रमाणे काम करेल. फ्रॉड झाल्यास हा हेल्पलाइन नंबर डायल करा. कॉल करणाऱ्या व्यक्तीला नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलमध्ये एक फॉर्मली कंप्लेंट दाखल करण्यास सांगितलं जाईल. त्यानंतर फायनेंशियल इंटरमिडियरीज (FI) कंसर्नसह एक तिकीट जनरेट होतं. फ्रॉड ट्रान्झेक्शन तिकीट डेबिटेड FI (फसवणूक झालेल्याचं बँक अकाउंट) आणि क्रेडिटेड FI (फ्रॉडस्टरचं वॉलेट किंवा बँक) डॅशबोर्डवर दिसतं. बँक किंवा वॉलेट जिथे तिकीट गेलं आहे त्या फ्रॉड ट्रान्झेक्शनचे डिटेल्स चेक करतं. जर फंड फ्रॉडस्टरकडे मूव्ह केला गेला असेल तर पुढील FI कडे याचे डिटेल्स शेअर केले जातात. परंतु फंड मूव्ह केला गेला नसल्यास तो होल्ड केला जातो. सायबर फ्रॉड झाल्यास युजरने लगेच संपूर्ण डिटेल्स सायबर हेल्पलाइनकडे द्यावेत. यात उशिर करू नये. डिस्काउंट, ऑफर्सच्या जाळ्यात अडकवून लोकांना फेक लिंक पाठवली जाते. या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक फेक वेबपेजवर रिडायरेक्ट केलं जातं. तिथे एक फॉर्म भरण्यासाठी सांगितला जातो. इथे पर्सनल डिटेल्स भरावे लागतात. युजर आपली माहिती इथे भरण्याची चूक करतात आणि मोठा फटका बसतो.

  हे वाचा - Guarantee-Warranty काळात कंपनीने प्रोडक्ट दुरुस्त करण्यास नकार दिल्यास काय कराल? या दोन्हीत काय आहे फरक

  सोशल मीडियावर डिस्काउंट, लॉटरी किंवा बक्षिस जिंकल्याच्या जाहिरांकडे लक्ष देऊ नका. जाहिरात पाहून ऑनलाइन शॉपिंगचा विचार करत असाल, तर आधी त्या वेबसाइटबाबत माहिती घ्या. वेबसाइटची रिटर्न पॉलिसी तपासा. काही शंका आल्यास त्यावर शॉपिंग करू नका. कोणतीही पर्सनल माहिती त्या वेबसाइटवर देऊ नका. तसंच कोणीही बँकेचा अधिकारी, वित्तीय संस्थेचा अधिकारी, टेलिकॉम कंपनीकडून बोलत असल्याचं सांगून तुमचे पर्सनल डिटेल्स आधार कार्ड नंबर, बँकिंग डिटेल्स मागत असेल तर ते देऊ नका. कोणताही बँक अधिकारी, टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांकडून अशाप्रकारे माहिती मागत नाही. त्यामुळे KYC अपडेट किंवा इतर कोणत्याही कारणासाठी कॉल आल्यास सावध व्हा.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Cyber crime, Online fraud, Tech news

  पुढील बातम्या