मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

SMS, WhatsApp, मिस्ड कॉलसह या पद्धतींनीही हॅक केला जातो मोबाईल फोन, अशी घ्या काळजी

SMS, WhatsApp, मिस्ड कॉलसह या पद्धतींनीही हॅक केला जातो मोबाईल फोन, अशी घ्या काळजी

असे अनेक सॉफ्टवेअर आहेत, ज्याच्याद्वारे लोकांना टार्गेट केलं जातं आणि त्यांच्यावर नजर ठेवली जाते. हॅकर्सकडून फोनमध्ये व्हायरस किंवा सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं जातं. यामुळे खासगी डेटा चोरी केला जाऊ शकतो.

असे अनेक सॉफ्टवेअर आहेत, ज्याच्याद्वारे लोकांना टार्गेट केलं जातं आणि त्यांच्यावर नजर ठेवली जाते. हॅकर्सकडून फोनमध्ये व्हायरस किंवा सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं जातं. यामुळे खासगी डेटा चोरी केला जाऊ शकतो.

असे अनेक सॉफ्टवेअर आहेत, ज्याच्याद्वारे लोकांना टार्गेट केलं जातं आणि त्यांच्यावर नजर ठेवली जाते. हॅकर्सकडून फोनमध्ये व्हायरस किंवा सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं जातं. यामुळे खासगी डेटा चोरी केला जाऊ शकतो.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 22 जुलै : पेगासस स्पायवेअर (Pegasus Spyware) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेकांवर या पेगाससद्वारे हेरगिरी केली जात आहे. पेगासस अतिशय अ‍ॅडव्हान्स आणि पॉवरफुल सॉफ्टवेअर आहे. पेगाससशिवाय इतरही असे अनेक सॉफ्टवेअर आहेत, ज्याच्याद्वारे लोकांना टार्गेट केलं जातं आणि त्यांच्यावर नजर ठेवली जाते.

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक स्पाय सॉफ्टवेअर हे रिमोटली युजर्सच्या फोनमध्ये अ‍ॅक्सेस केले जातात. रिमोटलीचा अर्थ दुसऱ्या ठिकाणी बसलेला हॅकर फोनचा संपूर्ण कंट्रोल त्याच्याकडे घेतो आणि फोन हवा तसा अ‍ॅक्सेस करतो. हे सर्व युजरच्या होम स्क्रिनवर दिसत नाही. युजर्सकडून झालेल्या काही लहानशा चुकांही भारी पडू शकतात. याचाच फायदा या हॅकर्सकडून घेतला जातो.

फेक अ‍ॅप्स -

सायबर क्रिमिनल्स आणि हॅकर्ससाठी (Hackers) ही अतिशय सोपी गोष्ट आहे. फेक अ‍ॅपद्वारे (Fake App) ते युजर्सच्या फोनला टार्गेट करतात. युजरला अ‍ॅप मॅलिशियस किंवा स्पायवेअर, मालवेअरसह डाउनलोड करुन दिले जातात. यात अधिकतर थर्ड पार्टी अ‍ॅप, सोशल मीडिया किंवा इतर ठिकाणी आलेल्या लिंक्स याद्वारे हे फेक अ‍ॅप्स ऑफर्सची आमिषं दाखवून किंवा इतर कारणांनी डाउनलोड करण्यासाठी सांगितली जातात आणि एकदा अ‍ॅप डाउनलोड झालं की फोनचा संपूर्ण कंट्रोल हॅकरकडे जातो. त्यामुळेच कधीही कोणत्याही लिंकवर क्लिक करुन त्यात पुढे दिलेल्या सूचनांकडे लक्ष देऊ नका. यामुळे फसवणुकीची मोठी शक्यता निर्माण होते.

(वाचा - तुमचं WhatsApp Chat इतर कोणी पाहत तर नाही ना? या ट्रिकने असं तपासा)

व्हॉट्सअ‍ॅप, ईमेल्स, SMS इतर सोशल मीडिया अ‍ॅप्सद्वारे हॅकर्स युजर्सला लिंक पाठवतात. अशा लिंकवर क्लिक केल्यानंतर फोनमध्ये व्हायरस किंवा सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं जातं. यामुळे खासगी डेटा चोरी केला जाऊ शकतो.

Missed Call -

मिस्ड कॉलद्वारेही पेगासस युजरला टार्गेट करतो. 2019 मध्ये WhatsApp मध्ये एक वल्नरेबिलिटी पाहण्यात आली होती. त्याच्या मदतीने स्पायवेअर अँड्रॉईड किंवा आयओएस फोनमध्ये केवळ कॉल करुन हॅकिंग होऊ शकतं होतं.

(वाचा - Instagram Security फीचर असं करा अ‍ॅक्टिव्हेट, तुमचं अकाउंट हॅकर्सपासून राहिल सेफ)

SIM Card Swap -

ज्यावेळी युजर्सची पर्सनल माहिती अ‍ॅक्सेस केली जाते, त्यावेळी सिम कार्ड स्वॅप या हॅकिंगचा वापर केला जातो. हॅकर्स टेलिकॉम ऑपरेटर्सला कॉन्टॅक्ट करुन सिम रिप्लेसमेंटची मागणी करतात आणि नवं सिम मिळाल्यावर जुनं सिम डिअ‍ॅक्टिव्हेट केलं जातं. म्हणजेच हॅकरकडे तुमच्या नंबरचा संपूर्ण अ‍ॅक्सेस जातो.

हॅकिंग अनेकदा सार्वजनिक ठिकाणी केलं जातं. त्यामुळे बाहेरील वायफायचा शक्यतो वापर टाळावा. हॅकर्स वायफाय, ब्लूटूथच्या मार्गानेही युजर्सला टार्गेट करुन हॅकिंग करतात. त्यामुळे कोणत्याही लिंकवर क्लिक न करणं, अ‍ॅनिव्हर्सरी ऑफर्स किंवा एखाद्या बड्या कंपनीच्या नावाने डिस्काउंट दिलं जात असल्याचं सांगितलेल्या लिंकला बळी पडू नका. खासगी माहिती ओटीपी, केव्हायसीची माहिती देऊ नका. तसंच थर्ड पार्टी अ‍ॅप डाउनलोड करु नका.

First published:

Tags: Cyber crime, Hacking, Online fraud, Tech news