मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /केवळ 15 मिनिटांत चार्ज होणारा Redmi चा Smartphone; फीचर्स आणि किंमत पाहा

केवळ 15 मिनिटांत चार्ज होणारा Redmi चा Smartphone; फीचर्स आणि किंमत पाहा

शाओमी कंपनीनं Redmi Note 11 Pro+ या स्मार्टफोनच्या जबरदस्त Battery Performance बद्दल माहिती दिली आहे.

शाओमी कंपनीनं Redmi Note 11 Pro+ या स्मार्टफोनच्या जबरदस्त Battery Performance बद्दल माहिती दिली आहे.

शाओमी कंपनीनं Redmi Note 11 Pro+ या स्मार्टफोनच्या जबरदस्त Battery Performance बद्दल माहिती दिली आहे.

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी शाओमीने (Xiomi smartphone) आतापर्यंत Redmi Note 11 सिरीज असलेल्या 10 लाखांहून अधिक स्मार्टफोनची विक्री केली आहे. त्यानंतर आता कंपनीनं Redmi Note 11 Pro+ या स्मार्टफोनच्या (redmi note 11 Pro+ specifications) जबरदस्त Battery Performance बद्दल माहिती दिली आहे. शाओमीने Weibo पोस्टमध्ये या स्मार्टफोनबद्दल माहिती देताना म्हटलंय की 'जेव्हा तुम्ही फुटबॉल खेळत असता तेव्हा तुम्ही एक सेकंदही मिस करू शकत नाही' रेडमी नोट 11 प्रो+ हा स्मार्टफोन याच Half Time चा फायदा घेऊ शकतो. Redmi चे General Manager लू वेइबिंग यांनी दुसऱ्यांदा पोस्ट करत 15 मिनटांमध्ये हा स्मार्टफोन फुल चार्ज होऊ शकतो असा दावा केला आहे.

Redmi Note 11 Pro+ मध्ये काय आहे खासियत?

Redmi Note 11 Pro+ हा स्मार्टफोन Note 11 सीरीजचा टॉप मॉडेल मानला जातो. कारण त्यात  120W चा फास्ट चार्जर सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये असलेल्या 4500 MAH बॅटरीला चार्ज करण्यासाठी केवळ 15 मिनटांचा वेळ लागतो.

आता Samsung कंपनी बनवणार Foldable स्मार्टफोन; पाहा फीचर्स

Two Charging Mode चा ही आहे सपोर्ट...

हा स्मार्टफोनमध्ये Fast Charge Protection, बिल्ट-इन सेफ्टी Identification चिप, Short-Circuit Protection, ओवर-व्होल्टेज प्रोटेक्शन आणि ओवर-टेम्परेचर प्रोटेक्शनचा सपोर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये Two Charging Mode चं फीचरही देण्यात आलं आहे. या स्मार्टफोनमध्ये तापमान नियंत्रित करण्याची क्षमता आहे. 120W फास्ट चार्जिंगची सुविधेबरोबर Redmi Note 11 Pro+ मध्ये 1818mm² VC लिक्विड-कूलिंग प्लेटचाही वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर स्मार्टफोनला थंड ठेवण्यासाठी Multilayer Graphite, थर्मल जेल आणि Copper foil ची सुविधा देण्यात आली आहे.

30 मिनटांत Xiaomi च्या 20 लाखांहुन अधिक Smart Watch ची विक्री...पाहा डिटेल्स

काय आहेत फीचर्स?

Redmi Note 11 Pro+ या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचची AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यात 2400×1080 पिक्सलचा FHD+ रेजोल्यूशनचं फीचरही देण्यात आलं आहे. यात 108MP चा अल्ट्रा-क्लियरचा (redmi note 11 pro plus price and specifications) मुख्य कॅमेरा आणि 3.5 MM चा हेडफोन जॅक देण्यात आला आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये NFC, इन्फ्रारेड आणि Wi-Fi 6 चं ही फीचर्स देण्यात आलं आहे.

Smartphone वर भारतीय रोज घालवतात इतका वेळ! App डाउनलोड करण्यााचा टक्काही वाढला

काय आहे Redmi Note 11 Pro+ ची किंमत?

- 6GB+128GB स्टोरेज- किंमत 23378 रुपये

- 8GB+128GB स्टोरेज- किंमत 24565 रुपये

- 8GB+256GB स्टोरेज- किंमत 26906 रुपये

First published:
top videos

    Tags: Redmi, Smartphones, Xiaomi redmi