नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : भारतात स्मार्टफोनच्या युजर्सची संख्या वाढत असतानाच आता एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. App Annie ने दिलेल्या रिपोर्टमध्ये भारतीय (average time spent on phone per day in India) युजर्स दररोज 4.8 तास स्मार्टफोनवर घालवत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता स्मार्टफोनवर वेळ घालवणाऱ्या देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानी पोहचला आहे. भारतात युजर्स दररोजच्या 24 तासांपैकी 4.8 तास स्मार्टफोनचा वापर करण्यात घालवत आहेत. मागच्या वर्षीच्या पहिल्या (Indians spend times on smartphones) तीन महिन्यांत हा दर 4 तासांपर्यंतचा होता. त्यात सर्वात जास्त गेमिंग आणि फिनटेकच्या युजर्सचा समावेश आहे.
चंद्रावर अब्जावधी माणसांना पुरेल एवढा ऑक्सिजन उपलब्ध? नवीन संशोधनातील निष्कर्ष
5.5 तासांसह इंडोनेशिया पहिल्या स्थानावर App Annie ने जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार स्मार्टफोनवर वेळ घालवण्यात इंडोनेशिया पहिल्या स्थानावर आहे तर 5.4 तासांसह ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे. 5 तासांसह दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानी तर 4.8 तासांसह भारत चौथ्या स्थानावर आहे. App Annie ने यावर्षीच्या तिमाहीचा रिपोर्ट जारी केला आहे. त्यात काही विशिष्ट Apps डाउनलोड करण्याचा दर हा 28 टक्क्यांनी वाढला आहे.
लॉन्च होणार Samsung चा जबरदस्त 5G Smartphone, कमी किमतीत मिळतील कमाल फीचर्स
त्यामुळे एकूण Apps ची संख्या ही 24 हजार कोटींच्या आसपास वाढली आहे. समोर आलेल्या या रिपोर्टनुसार भारत हा गेमिंग Apps साठी मोठं मार्केट आहे. कारण प्रत्येक पाचवं मोबाईल App हे भारतात डाउनलोड केलं जातं. त्यामुळं आता समोर आलेल्या या रिपोर्टनुसार भारतात स्मार्टफोनची विक्री आणि त्याचा वापर किती मोठ्या प्रमाणात होत आहे हे स्पष्ट होत आहे.