मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Redmi कंपनीच्या या दोन धमाकेदार SmartWatch झाल्या लॉन्च, पाहा किंमत आणि फीचर्स

Redmi कंपनीच्या या दोन धमाकेदार SmartWatch झाल्या लॉन्च, पाहा किंमत आणि फीचर्स

प्रसिद्ध स्मार्टवॉच कंपनी रेडमीने आता एकाचवेळी चक्क दोन स्मार्टवॉच लॉन्च केल्या आहेत. त्यात Redmi Smart Band Pro आणि Redmi Watch 2 Lite या दोन धमाकेदार स्मार्टवॉचचा समावेश आहे. या दोन्ही स्मार्टवॉचमध्ये सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत चांगले फीचर्स देण्यात आले आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : प्रसिद्ध स्मार्टवॉच कंपनी रेडमीने आता एकाचवेळी चक्क दोन स्मार्टवॉच लॉन्च केल्या आहेत. त्यात Redmi Smart Band Pro आणि Redmi Watch 2 Lite या दोन धमाकेदार (Redmi launches Redmi Smart Band Pro and Redmi Watch 2 Lite SmartWatch) स्मार्टवॉचचा समावेश आहे. या दोन्ही स्मार्टवॉचमध्ये सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत चांगले फीचर्स देण्यात आले आहे. त्यामुळं आता या दोन्ही स्मार्टवॉचच्या लॉन्चिंगची चर्चा होत आहे.

Redmi Smart band Pro

या स्मार्टवॉचमध्ये 1.47 इंचची स्क्रीन देण्यात आली असून यात 282 पिक्सल एवढी डेन्सिटी देण्यात आली आहे. त्याचबरोबर कंपनीनं यात 200mAh बॅटरीही देण्यात आली आहे. त्यामुळं आता या स्मार्टवॉचची बॅटरी 20 दिवस टिकेल असंही सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर या स्मार्टवॉचला पाणी आणि घामापासूनच्या धोक्यापासूनही सुरक्षा देण्यात आली आहे.

दिवाळीत Car खरेदी करायची आहे, पण बजेट नाहीये? ही कंपनी देतेय 1 लाखांपर्यंतची सूट

Redmi Watch 2 Lite

ही स्मार्टवॉच Redmi Watch 2 चा डाउन व्हर्जन असल्याचं बोललं जात आहे. यात 1.55 इंचचा टीएफटी डिस्प्ले देण्यात आला असून ज्याचं रेजोल्यूशन 320×360 एवढं  असेल. त्याचबरोबर या स्मार्टवॉचमध्ये इनबिल्ट GPS, SpO2 मॉनिटरिंग फीचर्स आणि 10 दिवसांचा बॅटरी बॅकअपही देण्यात आला आहे. त्याचबरोबर सतत जीपीएसचा वापर केला तर हा बॅटरी बॅकअप 14 तासांचा असणार आहे.

तुमचं WhatsApp इतर कोणी वापरतंय का? सोप्या ट्रिकने असं तपासा

किती किंमत असणार?

अजून रेडमी कंपनीनं या स्मार्टवॉचच्या किंमती (Redmi SmartWatch price and features) जाहिर केलेल्या नाहीत. त्यासंदर्भातील माहितीही कंपनीने दिलेली  नाही. त्यामुळं आता या दोन्ही स्मार्टवॉचच्या किंमती किती असणार याबद्दल ग्राहकांना उत्सुकता लागलेली आहे.

घरबसल्या Twitter वरुन कमवा पैसे? त्यासाठी करा असं की व्हाल 'मालामाल'

सध्या ऑनलाइन शॉपिंगचा (online shopping) ट्रेंड मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सणासुदीला (festival) सुरुवात झाली असून लवकरच दिवाळी (Diwali) येणार आहे. त्यामुळे रेडमीसह इतर प्रमुख स्मार्टवॉच कंपन्यांकडून स्मार्टवॉचच्या खरेदीवर मोठी सूट देण्यात येत आहे.

First published:

Tags: Smartwatch, Smartwatch features, Xiaomi redmi