जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Twitter कडून पैसे कमावयाची सुवर्णसंधी, घरबसल्या कमवा हजारो रुपये; जाणून घ्या कसे ते?

Twitter कडून पैसे कमावयाची सुवर्णसंधी, घरबसल्या कमवा हजारो रुपये; जाणून घ्या कसे ते?

Twitter कडून पैसे कमावयाची सुवर्णसंधी, घरबसल्या कमवा हजारो रुपये; जाणून घ्या कसे ते?

हे फीचर नेमकं काय आहे आणि त्यातून कसे पैसे मिळवता येतील याबद्दल आज आपण माहिती घेऊया.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर:  आपल्यापैकी अनेकांची सोशल मीडियावर (social media) अकाऊंट्स आहेत. दिवसातील बराचसा वेळ आपण विविध सोशल मीडिया साईट्सवर घालवतो. काहींना तर जवळपास त्याचं व्यसन लागल्यासारखच आहे. दिवसभर ते सोशल मीडियावर असतात. ब्लॉगर्स वगळता इतरांना त्यातून काहीही फायदा होत नाही. मात्र, आता एका सोशल मीडिया साईटच्या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या पैसे कमावता (earn money) येणार आहेत. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) तुम्हाला ही संधी देत आहे. ट्विटरच्या सुपर फॉलो (Super Follow) या फीचरच्या मदतीने तुम्हाला पैसे मिळवता येऊ शकतात. हे फीचर नेमकं काय आहे आणि त्यातून कसे पैसे मिळवता येतील याबद्दल आज आपण माहिती घेऊया. ट्विटरनं सुपर फॉलोज नावाचं एक नवीन फीचर लाँच केलं आहं. यामुळे कन्टेट क्रिएटर्सनी क्रिएट केलेला डेटा आपल्या फॉलोअर्सला शेअर केल्यानंतर पैसे मिळणार आहेत. या फिचरच्या मदतीनं तुम्ही घरबसल्या पैसे मिळवू शकता. सध्या हे फीचर फक्त आयओएस (iOS) यूजर्ससाठी म्हणजेच आयफोन यूजर्ससाठी उपलब्ध केलेलं आहे. हेही वाचा-  दिवाळीत iPhone 13 स्वस्तात खरेदीची संधी, पाहा काय आहे ऑफर

 अशी होईल कमाई -

युजर्सच्या प्रोफाइलवर एक सुपर फॉलो बटण असेल, ज्यावर टॅप केल्यानंतर त्यांना त्यांची ‘फी ऑफर’ दिसेल. जर युजर्सना यात रस असेल, तर ते त्यावर पुन्हा टॅप करून अॅपमधील पेमेंट ऑप्शनद्वारे हे नवीन फीचर सबस्क्राइब करू शकतात. फॉलोअर्सची संख्या किती असावी? 10 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स असलेलं ट्विटर अकाउंट या सुपर फॉलो सबस्क्रिप्शनसाठी पात्र आहे. याशिवाय तुमचं 18 वर्षे पूर्ण असावं आणि गेल्या 30 दिवसांच्या काळात तुम्ही किमान 25 वेळा ट्विट केलेलं असलं पाहिजे. एकदा तुम्ही एखाद्याला फॉलो केलं की, त्याचा फक्त ‘सबस्क्रायबर ओन्ली’ कन्टेट तुमच्या टाइमलाइनवर दिसेल. जर तुम्ही एखाद्याला नंतर अनसबस्क्राइब करू इच्छित असाल तर कधीही तुमच्या अॅप सबस्क्रिप्शनमधून किंवा आयओएसमधून अनसबस्क्राइब करू शकता. प्रभावशाली मेकअप आर्टिस्ट आणि क्रीडा तज्ज्ञ 3 ते 10 डॉलर्स प्राइस कॅटेगरीमध्ये त्यांच्या त्यांच्या सबस्क्रायबरर्ससाठी कन्टेट शेअर करू शकतात. फक्त ‘या’ युजर्सला मिळेल संधी ट्विटरचं नवीन फीचर सध्या फक्त युएस (US) आणि कॅनडासाठी (Canada) रिलिज केलं गेलं आहे. पुढील काही आठवड्यांत फॉलोअप फीचर जगभरातील आयओएस युजर्ससाठी उपलब्ध करून दिलं जाईल, अशी माहिती कंपनीनं दिली आहे. बाकीच्या युजर्सना मात्र, या फिचरसाठी आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे. हेही वाचा-  तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? या 5 Digital Hiring Apps द्वारे होईल मोठी मदत

 एकूणचं जर तुम्ही आयओएस प्रणालीसह ट्विटरचा वापर करत असाल आणि तुम्ही नियमित स्वरूपात ट्विटरवर लिहीत असाल तर तुम्हाला घरबसल्या पैसे कमवण्याची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: twitter
  • First Published :
जाहिरात
जाहिरात