नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : भारतासह जगभरात WhatsApp युजर्सची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे युजर्सच्या डेटा आणि प्रायव्हसीकडेही (WhatsApp account Hack) कंपनीला विशेष लक्ष द्यावं लागतंय. इतकी सुरक्षा असतानाही काही हॅकर्स सहजपणे एखाद्या व्हॉट्सअॅप अकाऊंट्सला हॅक करून (Someone using your WhatsApp account secretly) त्यातील चॅट आणि इतर डाटा सहजरित्या मिळवतात.
आपलं WhatsApp हॅक झाल्याचं युजर्सला लगेच समजतं नाही. परंतु अकाउंटवर काही आक्षेपार्ह मेसेजेस किंवा कॉलिंग झाल्याचं लक्षात येतं, त्यावेळी अकाऊंट हॅक झाल्याचं युजर्सला समजतं. कारण या वेळी युजर्ससोबत हॅकरही त्या व्यक्तीचं WhatsApp Account हँडल करत असतो.अशा धोकादायक हॅकिंगपासून Smartphone आणि WhatsApp Account च्या सुरक्षेसाठी काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
युजरने सर्वात आधी अॅपमधील WhatsApp Activity चेक करणं गरजेचं आहे. कारण त्या युजरशिवाय दुसरं कुणी अकाउंट वापरत आहे का याची खात्री करता येते. त्याचबरोबर व्हॉट्सअॅपमध्ये (WhatsApp account information and account security) असे काही मेसेज किंवा कॉल्स जे युजर्सने केलेले नाही, अशा मेसेज किंवा कॉल्सवरही नजर ठेवायला हवी.
जर तुमच्या व्हॉट्सअॅप अकाउंटबाबत असं काही घडत असेल, तर तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट सुरक्षित नाही. त्यासाठी सर्वात पहिलं WhatsApp अकाउंटमधील WhatsApp Web या ऑप्शनमध्ये तुमचं व्हॉट्सअॅप, इतर कोणाच्या अकाउंटशी लिंक नाही ना, याची खात्री करा.
त्याचबरोबर WhatsApp अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी Two-Factor Authentication ची प्रोसेस पूर्ण करायला हवी. तिथे पासवर्डही सेट करा. त्यामुळे कोणीही तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट इतर स्मार्टफोन्सवर लॉगइन झाल्यास, तिथे पासवर्ड टाकावा लागेल. तो पासवर्ड केवळ तुमच्याकडेच असल्याने इतर कोणीही अकाउंट ओपन करू शकणार नाही. यात युजरचं WhatsApp अकाउंट सुरक्षित राहिल आणि हॅकिंगच्या धोक्यापासून बचाव करता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.