मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Realme Q5 Pro चे फीचर्स लाँचिंग आधीच लीक, काय असेल फोनमध्ये खास?

Realme Q5 Pro चे फीचर्स लाँचिंग आधीच लीक, काय असेल फोनमध्ये खास?

रियलमी क्यू 5 प्रोमध्ये 80W फास्ट-चार्जिंग सपोर्टसह 5000mAh क्षमतेची बॅटरी मिळणार असल्याचं कन्फर्मेशन रियलमीच्या वेईबो (Weibo) अकाउंटवर देण्यात आलं आहे. हा फोन अँड्रॉईड 12 वर (Android 12) काम करेल अशी माहिती मिळाली आहे.

रियलमी क्यू 5 प्रोमध्ये 80W फास्ट-चार्जिंग सपोर्टसह 5000mAh क्षमतेची बॅटरी मिळणार असल्याचं कन्फर्मेशन रियलमीच्या वेईबो (Weibo) अकाउंटवर देण्यात आलं आहे. हा फोन अँड्रॉईड 12 वर (Android 12) काम करेल अशी माहिती मिळाली आहे.

रियलमी क्यू 5 प्रोमध्ये 80W फास्ट-चार्जिंग सपोर्टसह 5000mAh क्षमतेची बॅटरी मिळणार असल्याचं कन्फर्मेशन रियलमीच्या वेईबो (Weibo) अकाउंटवर देण्यात आलं आहे. हा फोन अँड्रॉईड 12 वर (Android 12) काम करेल अशी माहिती मिळाली आहे.

  मुंबई, 18 एप्रिल : सध्या एकदम लेटेस्ट टेक्नॉलॉजी (Latest Technology) असलेल्या स्मार्टफोनला प्रचंड मागणी आहे. हिच गोष्ट लक्षात घेऊन विविध स्मार्टफोन (Smartphone) उत्पादक कंपन्या सातत्यानं आपल्या प्रॉडक्ट्समध्ये बदल करत आहेत. सध्या मार्केटमध्ये स्मार्टफोन कंपन्यांची जोरदार स्पर्धा सुरू आहे. ग्राहकांना चांगल्या बजेटमध्ये जास्तीत जास्त फीचर्स असलेले फोन देण्याचा प्रयत्न प्रत्येक कंपनी करत असल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून रियलमीचे स्मार्टफोन्स (Realme Smartphones) मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. चांगली फीचर्स (Features) असलेले स्मार्टफोन्स मार्केटमध्ये लाँच करण्याचा प्रयत्न कंपनी करत आहे. आता रियलमी आपल्या चायनीज ग्राहकांसाठी (Chinese Customers) क्यू सीरिज (Q Series) फोन लाँच करण्याची तयारी करत आहे. येत्या 20 एप्रिल रोजी चीनमध्ये रियलमी क्यू 5 (Realme Q5) सीरिज लाँच केली जाणार आहे. याबाबत कंपनीने कन्फर्मेशन दिलं असून, या सीरिजमध्ये रियलमी क्यू 5 (Realme Q5), रियलमी क्यू 5i (Realme Q5i) आणि रियलमी क्यू 5 प्रो (Realme Q5 Pro) यांचा समावेश आहे. या तीन फोनचे तपशील अद्याप उघड झालेले नाहीत. मात्र, रियलमी क्यू5 प्रोची काही स्पेसिफिकेशन्स (Specifications) लीक झाली असून, कंपनीनेही त्याला दुजोरा दिला आहे.

  रियलमी क्यू 5 प्रोमध्ये 80W फास्ट-चार्जिंग सपोर्टसह 5000mAh क्षमतेची बॅटरी मिळणार असल्याचं कन्फर्मेशन रियलमीच्या वेईबो (Weibo) अकाउंटवर देण्यात आलं आहे. हा फोन अँड्रॉईड 12 वर (Android 12) काम करेल अशी माहिती मिळाली आहे. शिवाय यामध्ये 6.62- इंचांचा FHD+ AMOLED डिस्प्ले पॅनेल असेल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असू शकतो.

  Smartphone मध्ये आग लागण्याची 5 महत्त्वाची कारणं, अशी घ्या काळजी

  ट्रिपल रिअर कॅमेरा मिळण्याची शक्यता

  Realme Q5 Pro च्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाईल. फोन स्क्रीनवर होल-पंच कटआउटसह कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. फोनचं पॉवर बटण आणि व्हॉल्यूम बटण उजवीकडे असेल. खालील बाजूला स्पीकर ग्रिल आणि यूएसबी टाइप-सी पोर्टदेखील असेल. फोनच्या साईडला आणि मागे फिंगरप्रिंट रीडर नसल्याचं सांगण्यात आलं आहे. म्हणजेच फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि AMOLED स्क्रीन असेल. रियलमी क्यु5 Pro मध्ये पिवळ्या रंगाच्या फिनिशसह फिकट आणि गडद चेकरबोर्ड डिझाइन असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं फोनला रेसर लूक मिळत आहे.

  Railway Ticket बुक करताना कशी मिळेल कन्फर्म लोअर बर्थ, IRCTC ने सांगितला नियम

  चायनीज टिपस्टर 'पांडा इज बाल्ड'वर लीक झालेल्या माहितीनुसार, गीकबेंचवर फोनचे फिचर्स लीक झाले आहेत. गीकबेंच लिस्टिंगनुसार, रियलमी क्यु 5 Proमध्ये स्नॅपड्रॅगन 870 SoC प्रोसेसरसह 8GB रॅम मिळणार आहे. रियलमी क्यु5 सिरीज सुरुवातीला चीनमध्ये लाँच केल्यानंतर ती इंटरनॅशनल मार्केटमध्ये आणली जाईल, अशी शक्यता आहे.

  First published:

  Tags: Realme, Smartphone, Tech news