Home /News /technology /

12 हजारहून कमी किंमतीत मिळतोय 50MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी स्मार्टफोन; पाहा जबरदस्त फीचर्स

12 हजारहून कमी किंमतीत मिळतोय 50MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी स्मार्टफोन; पाहा जबरदस्त फीचर्स

Realme Narzo 50A फोन 7 ऑक्टोबरपासून realme.com, Flipkart आणि मेनलाइन रिटेल चॅनेलवर उपलब्ध केला जाईल.

  नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : Realme Narzo 50A आणि Realme Narzo 50i भारतात लाँच झाले आहेत. या दोन्ही फोनपैकी Realme Narzo 50A अधिक प्रीमियम आहे. यात 6000mAh बॅटरी देण्यात आली असून MediaTek Helio G85 SoC प्रोसेसर आहे. 50 मेगापिक्सल कॅमेरासह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनसह कंपनीने Realme Band 2 Fitness आणि स्मार्ट टीव्ही Realme Neo 32 लाँच केला आहे. Realme Narzo 50A दोन स्टोरेज वेरिएंटमध्ये येतो. याच्या 4GB+64GB मॉडेलची किंमत 11,499 रुपये आणि याच्या 4GB+128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,499 रुपये आहे. हा फोन ऑक्सिजन ग्रीन आणि ऑक्सिजन ब्लू कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे. Realme Narzo 50A फोन 7 ऑक्टोबरपासून realme.com, Flipkart आणि मेनलाइन रिटेल चॅनेलवर उपलब्ध केला जाईल. Realme Narzo 50A Specifications - - 6.5 इंची HD+ 720×1,600 पिक्सल वाटरड्रॉप-स्टाइल नॉच डिस्प्ले - Android 11 बेस्ड Realme UI 2.0 - MediaTek Helio G85 चिपसेट - ARM Mali-G52 GPU - 6,000mAh बॅटरी - 18W फास्ट चार्जिंग

  Poco C4 स्मार्टफोन भारतात या तारखेला होणार लॉन्च; पाहा डिटेल्स

  ट्रिपल कॅमेरा - या फोनला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात f/1.8 अपर्चरसह 50-मेगापिक्सल प्राइमरी कॅमरा सेंसर, f/2.4 अपर्चरसह ब्लॅक अँड व्हाइट पोर्ट्रेट लेंस आणि f/2.4 अपर्चरसह 2-मेगापिक्सल मॅक्रो लेंस आहे. फोनला f/2.0 अपर्चरसह 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

  iPhone 13 खरेदीवर 46 हजारांपर्यंतची सूट, Appleची जबरदस्त ऑफर;असा घेता येईल फायदा

  फोनला 6,000mAh बॅटरी देण्यात आली असून सिंगल चार्जमध्ये 53 दिवसांचा स्टँडबाय टाइम, 48 तासांच्या कॉलिंगसह असण्याचा दावा कंपनीने केला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये USB टाइप-सी पोर्ट, wifi802.11 एसी, GPS, ब्लूट्यूथ 5 आणि डुअल सिम स्लॉट सामिल आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Realme, Smartphone, Tech news

  पुढील बातम्या