• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • Poco C4 स्मार्टफोन भारतात या तारखेला होणार लॉन्च; पाहा डिटेल्स

Poco C4 स्मार्टफोन भारतात या तारखेला होणार लॉन्च; पाहा डिटेल्स

कंपनीने प्रसिद्ध केलेल्या टीझरमध्ये Poco C4 बद्दल कुठलेही स्पेसिफिक डिटेल्स दिलेले नाहीत. त्यांनी केवळ ‘C U Soon’ इतकंच लिहिलंय

  • Share this:
मुंबई 24 सप्टेंबर : मोबाईल हा आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक झाला आहे. स्मार्टफोनशिवाय (Smart Phone) राहणं बहुतेक सगळ्यांनाच अवघड जातं. आपल्याबरोबर कुणीतरी जोडीदार असल्याची भावना अनेकांच्या मनात सोबत मोबाईल असताना निर्माण होते. जरा मोकळा वेळ मिळाला की मोबाईलमध्ये काहीतरी पाहणे ही सवयच झाली आहे. मग बाजारात येणाऱ्या नवनव्या मोबाईलची स्पेसिफिकेशन्स (Mobile Specifications) पाहणे आणि तो कसा घेता येईल याचा विचार करणे ही पण एक सवय आहे. अशा सर्वांसाठीच ही बातमी आहे. पोको सी सीरिजमधला Poco C4 हा फोन 30 सप्टेंबरला लाँच होणार (Poco C4 Launch Date) आहे. याचा टीझर कंपनीने गुरुवारी सोशल मीडियावर लाँच केला. या टीझर फोटोमध्ये या फोनचा लूक पाहून युजर्सची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याबबातचं वृत्त गॅजेट्स डॉट एनडीटीव्ही डॉटकॉमने दिलं आहे. महागडा iPhone Switch Off किंवा चोरी झाला तरी करता येणार ट्रॅक,IOS 15चं खास फीचर Poco C4 मॉडेलची किंमत अजून जाहीर झालेली नसली तरीही तो गेल्यावर्षी कंपनीने लाँच केलेल्या Poco C3 चं पुढचं व्हर्जन आहे असं वाटतंय. Poco C3 हा रेडमी 9सी सारखाच होता ज्यात मागच्या बाजूला तीन कॅमेरा (Three Cameras) होते. वॉटरड्रॉप पद्धतीचा डिस्प्ले नॉच होता. पोको इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून Poco C4 चा टीझर गुरुवारी लाँच करण्यात आला. हा फोन प्रत्यक्ष 30 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता बाजारात लाँच होईल असं या टीझरमध्ये म्हटलं आहे. शाओमीच्या या स्पिन-ऑफ ब्रँडने टीझर पोस्ट केल्याकेल्या फॉलोअर्सनी Poco C4 कधी लाँच होऊ शकतो याचा कयास मांडणाऱ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात कंपनीने लाँच केलेल्या Poco C3 या फोनचं हे पुढचं व्हर्जन असू शकतं. Poco C3 हा सर्वांत परवडणारा फोन होता. कंपनीने प्रसिद्ध केलेल्या टीझरमध्ये Poco C4 बद्दल कुठलेही स्पेसिफिक डिटेल्स दिलेले नाहीत. त्यांनी केवळ ‘C U Soon’ इतकंच लिहिलंय. म्हणजे त्यांना जणू सुचवायचं आहे की Poco C सीरिजमधलं नवं मॉडेल लवकरच बाजारात दाखल होत आहे. Poco C3 ची या वर्षी जानेवारीपर्यंत भारतात 1 मिलियन युनिट विकली गेली असून ऑगस्ट 2021 पर्यंत ही संख्या 2 मिलियन झाली होती. सध्या 3GB RAM + 32GB स्टोरेज असणारा Poco C3 फोन 7 हजार 349 रुपयांमध्ये उपलब्ध असून 4GB RAM + 64GB स्टोरेजचा मोबाईल 8 हजार 349 रुपयांना उपलब्ध आहे. मोबाईल नंबर लिंक नसला तरी Aadhaar Card डाऊनलोड करता येईल; अशी आहे सोपी प्रोसेस Poco C3 ची स्पेसिफिकेशन्स Poco C3 मध्ये 6.53-inch HD+ (720x1,600 pixels) डिस्प्ले असून, octa-core MediaTek Helio G35 SoC प्रोसेसरसह 4GB of RAM उपलब्ध आहे. फोनच्या मागच्या बाजूला तीन कॅमेरे असून ज्यात 13-megapixel प्रायमरी सेन्सर आहे. पुढच्या बाजूला 5-megapixel चा सेल्फी कॅमेराही आहे. या फोनमध्ये 5,000mAh battery आणि 10W charging फॅसिलिटी आहे. तसंच फोनला Micro-USB port ही आहे. Poco C3 मायक्रो एसडी कार्ड वापरून मेमरी 512GB पर्यंत वाढवता येते.
First published: