नवी दिल्ली, 2 मे : वनप्लस स्मार्टफोनमध्ये ब्लास्ट झाल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. पण आता आणख एका चायनिज ब्रँडच्या फोनचा स्फोट झाल्याचं समोर आलं आहे. रियलमीचे अनेक स्मार्टफोन अतिशय पॉप्युलर आहे. त्यापैकी Narzo सीरिज पॉप्युलर आहे. याच Narzo सीरिजमधील फोनचा ब्लास्ट झाल्याचा दावा युजरने केला आहे.
एका Realme युजरने Narzo 50A फोनमध्ये स्फोट झाल्याचं म्हटलं आहे. त्याने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून ते व्हायरलही होत आहेत. हा ब्लास्ट फोन बॅगमध्ये असताना झाला असल्याचं म्हटलं गेलं असून हा प्रकार इंडोनेशियामध्ये घडल्याची माहिती आहे.
ट्विटर युजरने दिलेल्या माहितीनुसार, बॅगमध्ये असं काहीच नव्हतं, ज्याने फोनचा ब्लास्ट होईल. ट्विटरवर फोटो शेअर करत युजरने कंपनीने दिलेलं उत्तरही शेअर केलं आहे. रियलमीने याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितलं, की हा युजरचाच एरर होता. स्मार्टफोनची बॅटरी ब्लास्ट झालेली नाही, तर फोनच्या इतर पार्टमध्ये ब्लास्ट झाला आहे. त्यामुळे कंपनीने युजरच्या चुकीमुळेच हा ब्लास्ट झाल्याचा म्हटलं आहे.
याआधीही अशाच प्रकारची एक घटना समोर आली होती. त्यावेळी Redmi Note 11 Pro Plus 5G फोनचा ब्लास्ट झाला होता. युजरने त्याला नवा फोन घेऊन केवळ 10 दिवसच झाल्याचं म्हटलं होतं. युजरने कंपनीला फोटो टॅग करत त्यावर त्वरित कारवाईची मागणी केली होती.
A Realme Narzo 50A user in Indonesia reported that the top part of his phone exploded out of nowhere, when the phone was in his bag.
He said there was nothing potentially dangerous inside the bag, but the person from Realme said "it was a user error". pic.twitter.com/nbmU5yXdEU — Alvin (@sondesix) May 1, 2022
Realme GT Neo 3 -
Realme ने काही दिवसांपूर्वी Realme GT Neo 3 फोन लाँच केला होता. Realme GT Neo 3 मध्ये 6.7 इंची 2K डिस्प्ले, एचडीआर10+, डीसी डिमिंग सपोर्ट आणि 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला होता. हा फोन आपल्या फीचर्सशिवाय Ultra Dart Charge कारणामुळेही चर्चेत आहे. हा फोन केवळ पाच मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होण्याचा दावा कंपनीने केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Realme, Smartphone, Tech news