अगदी काही मिनिटांत फुल चार्ज होणारा Realme चा नवा फोन! वाचा काय आहेत फीचर्स

अगदी काही मिनिटांत फुल चार्ज होणारा Realme चा नवा फोन! वाचा काय आहेत फीचर्स

रिअलमी (Realme) कायमच अगदी कमी किमतीत भन्नाट स्पेसिफिकेशन असणारे फोन लाँच करत असल्याचं आपण बघितलं आहे. रिअल मी 2021 मधील त्यांचा पहिला फ्लॅगशिप फोन लाँच करण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 जानेवारी : रिअलमी (Realme) कायमच अगदी कमी किमतीत भन्नाट स्पेसिफिकेशन असणारे फोन लाँच करत असल्याचं आपण बघितलं आहे. रिअल मी 2021 मधील त्यांचा पहिला फ्लॅगशिप फोन लाँच करण्याची शक्यता आहे. या फोनच्या स्पेसिफिकेशन बाबतीत मार्केट मध्ये बऱ्याच चर्चा आहेत. तसेच Realme च्या या नव्या फोनची डिझाईन Oppo Ace 2 च रीब्रँडेड व्हर्जन असल्याचं बोललं जात आहे.

गेल्या महिन्यातच रिअलमीचे वाइस प्रेजिडेंट Xu Qi Chase ने Realme चा नवा Realme Race लवकरच मार्केट मध्ये लाँच होणार असल्याची घोषणा केली होती. तसेच त्यावेळी त्यांनी Realme Race च स्पेसिफिकेशन्स आणि डिझाईनमध्ये काही महत्त्वाचे बदल केले असल्याची माहिती दिली होती. पण रिअल मी रेस मार्केट मध्ये येण्यापूर्वीच आता एका टिपस्टर आईस युनिव्हर्सने (Ice Universe) रिअलमी रेस संबंधित काही महत्त्वाची माहिती लीक केली आहे.

(हे वाचा-या राष्ट्राध्यक्षांनी सोडलं Whatsapp, प्रायव्हसी पॉलिसीचा परिणाम)

टिपस्टरच्या पोस्टनुसार Realme Race मध्ये 5000 एमएएच बॅटरी, स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट आणि 12 जीबी रॅम देण्यात येणार आहे. तसेच विशेष बाब म्हणजे या स्मार्टफोनला 125 वॅटचा अल्ट्रा-फास्ट चार्जिंग सपोर्ट असून हा फोन अगदी काही मिनिटांत  पूर्णपणे चार्ज होणं शक्य असल्याचं बोललं जात आहे.

या माहितीनुसार Realme Race हा स्मार्टफोन  Oppo Ace 2 फोन सारखाच असल्याची शंका आहे. या पोस्ट मध्ये टिपस्टरने Realme Race स्मार्टफोन ओप्पो ऐस 2 चं अपग्रेडेड व्हर्जन असल्याचा दावा केला आहे. जर Realme Race हा स्मार्टफोन ओप्पो ऐस 2  चं अपग्रेडेड व्हर्जन असेल तर या फोन मध्ये सर्कुलर कॅमरा मॉड्यूल आणि  होल-पंच डिस्प्ले असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. पण या दाव्याप्रमाणे Realme Race स्मार्टफोन Oppo Ace 2 प्रमाणे असला तरीही भारतात अजून Oppo Ace 2 लाँच झालेला नाही म्हणून Realme Race ला भारतात मोठ्या मार्केटिंग ची संधी आहे. भारतामध्ये या फोनची किंमत 62470 रुपये असण्याची शक्यता आहे.

हे आहेत इतर फीचर्च

परफॉर्मेंस-  Qualcomm Snapdragon 888

डिस्प्ले- 6.6 inches (16.76 cm)

स्टोरेज- 256 GB

कॅमरा- 64 MP 8 MP 8 MP 2 MP

बॅटरी-  5000 mAh

रॅम    12 GB, 12 जीबी

(हे वाचा-2,499 रुपयांत OnePlus Band लाँच; जबरदस्त फीचर्ससह Mi Band ला टक्कर देणार)

मार्केटमध्ये असलेला रिअल मी चा हा नवा फोन रिअल मी रेस सध्या जोरदार चर्चेत असला तरी रिअल मी  कंपनीने अधिकृतपणे अद्याप कोणतीही लाँच तारीख जाहीर केलेली नाही. तसेच हा स्मार्टफोन भारतीय बाजारात येईल की नाही या संबंधित अजून काहीही ठोस माहिती पुढे आलेली नाही.

Published by: News18 Desk
First published: January 12, 2021, 5:33 PM IST

ताज्या बातम्या