मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Turkish राष्ट्राध्यक्षांनीही Whatsapp वापरणं सोडलं, प्रायव्हसी पॉलिसीचा परिणाम

Turkish राष्ट्राध्यक्षांनीही Whatsapp वापरणं सोडलं, प्रायव्हसी पॉलिसीचा परिणाम

विविध समाजमाध्यमांच्या वापरामुळं आपलं खासगीपण धोक्यात आलं आहे अशी नेहमीच चर्चा असते. आता Whatsapp बाबतही चर्चा सुरू झाली आहे आणि त्याला पर्याय शोधला जात आहे.

विविध समाजमाध्यमांच्या वापरामुळं आपलं खासगीपण धोक्यात आलं आहे अशी नेहमीच चर्चा असते. आता Whatsapp बाबतही चर्चा सुरू झाली आहे आणि त्याला पर्याय शोधला जात आहे.

विविध समाजमाध्यमांच्या वापरामुळं आपलं खासगीपण धोक्यात आलं आहे अशी नेहमीच चर्चा असते. आता Whatsapp बाबतही चर्चा सुरू झाली आहे आणि त्याला पर्याय शोधला जात आहे.

अंकारा, 11 जानेवारी : आजवर व्हाट्सअप (whatsapp) अनेकांसाठी आवश्यक संवाद माध्यम बनलं होतं. मात्र व्हाट्सएपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीनं (privacy policy) अनेकांना व्हॉट्सअप सोडण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडलं आहे.

सामान्यांसह अनेक महत्त्वाच्या व्यक्तीही असा निर्णय घेत आहेत. टर्कीचे राष्ट्रपती रेचप तैयप एर्दोगन (Turkish President Recep Tayyip Erdogan) यांचाही यात समावेश आहे. त्यांच्या कार्यालयातील माध्यम विभागानं (media department) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (social media platform) व्हाट्सअप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही, टर्कीच्या संरक्षण मंत्रालयानंही (Defense ministry)  म्हणलं आहे, की आता ते व्हॉट्सअपचा वापर करणार नाहीत.

ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, राष्ट्रपती एर्दोगान यांनी 11 जानेवारीला आपले व्हॉट्सअप ग्रुप्स एन्क्रिप्टेड मेसेजिंग ऍप BiP वर ट्रान्सफर करण्याचा आदेश दिला आहे. BiP हे टर्कीचं एक एन्क्रिप्टेड मेसेजिंग ऍप आहे. याची मालकी टर्कसेल इलेटेसिम हिजमेटेलरी एएसकडे आहे. आता सर्वांना BiPवर बनलेल्या अकाउंटच्या माध्यमातून राष्ट्रपती कार्यालय आणि रक्षा मंत्रालयाकडून सूचना आणि माहिती दिली जाईल. राष्ट्रपतीच्या व्हॉट्सअप सोडण्याच्या घोषणेनंतर टर्कीमध्ये या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मविरुद्ध आवाज अजूनच तीव्र झाले आहेत.

टर्कीमध्ये बहुतांश लोक व्हॉट्सअप सोडून BiP ऍप जॉईन करत आहेत. टर्कसेल कंपनीनं रविवारी सांगितलं, की मागच्या 24 तासात जवळपास 10 लाख नवे युजर्स Bip मेसेंजरसोबत जोडले गेले आहेत. हे ऍप 2013 मध्ये लॉन्च झाल्यांनतर 53 मिलियनहोऊन जास्त वेळा डाउनलोड केलं गेलं आहे.

व्हॉट्सअपनं नव्या वर्षात आपली प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली आहे. ही पॉलिसी स्वीकार करण्यासाठी व्हॉट्सअपनं युजर्सना 8 फेब्रुवरीपर्यंतचा वेळ दिला आहे. जर या पॉलिसीला नकार दिला तर युजर्सचे अकाउंट्स डिलीटही होऊ शकतात.

First published:
top videos

    Tags: Privacy, Turkey, Whats app news, Whatsapp