मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /2,499 रुपयांत OnePlus Band लाँच; जबरदस्त फीचर्ससह Mi Band ला टक्कर देणार

2,499 रुपयांत OnePlus Band लाँच; जबरदस्त फीचर्ससह Mi Band ला टक्कर देणार

One Plus चा नुकताच एक नवीन बँड लाँच झाला आहे. हा बँड 13 जानेवारीपासून ऍमेझॉन (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart) आणि वन प्लसच्या (One Plus) ऑफिशिअल साईटवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

One Plus चा नुकताच एक नवीन बँड लाँच झाला आहे. हा बँड 13 जानेवारीपासून ऍमेझॉन (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart) आणि वन प्लसच्या (One Plus) ऑफिशिअल साईटवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

One Plus चा नुकताच एक नवीन बँड लाँच झाला आहे. हा बँड 13 जानेवारीपासून ऍमेझॉन (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart) आणि वन प्लसच्या (One Plus) ऑफिशिअल साईटवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

नवी दिल्ली, 11 जानेवारी: वन प्लसने (OnePlus) भारतात पहिल्यांदाच फिटनेस ट्रॅकर One Plus Band लाँच केला आहे. वन प्लसचा हा बँड यापूर्वी भारतात लाँच झालेल्या MI आणि Honor Band 5 शी मिळताजुळता आहे. वन प्लसचा हा बँड घेण्यासाठी ग्राहकांना Rs.2499 मोजावे लागणार आहे.

हा बँड 13 जानेवारीपासून अ‍ॅमेझॉन (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart) आणि वन प्लसच्या (One Plus) ऑफिशिअल साईटवर ग्राहक हा बँड खरेदी करु शकतात. माहितीनुसार, बँडच्या बॉक्समध्ये वनप्लस बँड (One Plus Band), ब्लॅक कलर स्ट्रॅप (Black Colour Strap), वायर्ड चार्जिंग डोंगल (Wire Charging Dongle), यूजर गाइड (User Guide), रेड केबल क्लब वेलकम कार्ड (Red Cable Club Welcome Card), सेफ्टी आणि वॉरंटी कार्ड (Warranty Card)   उपलब्ध आहेत. याशिवाय ब्लॅक रंगाच्या बँड व्यतिरिक्त ऑरेन्ज (Orange) आणि ब्लू (Blue) हे 2 रंगही बँड्समध्ये उपलब्ध असणार आहे. पण त्यासाठी ग्राहकांना आणखी Rs.399 रुपये मोजावे लागणार आहे.

(वाचा - WhatsAppमध्ये मोठी त्रुटी!Googleवर कोणीही शोधू शकतं तुमचा फोटो, जॉईन करतात ग्रुप)

हा वनप्लस फिटनेस ट्रॅकर आयताकृती डिस्प्ले (Rectangular Display), मल्टिपल स्ट्रॅप कलर (Multiple Strip Colour) आणि वॉच फेस सपोर्टसह उपलब्ध असेल. वनप्लस बँडमध्ये 13 एक्झरसाईझ मोड (Exercise Mode) आणि रिअल-टाइम हार्ट रेट मॉनिटरिंग (Real Time Heart Rate Monitoring) यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. वनप्लस बँडमध्ये 1.1 इंचाचा टच एमोलेड डिस्प्ले असून रिजोल्यूशन 126x294 पिक्सल आहे. बँडचा ब्राईटनेस मॅनुअली अडजस्टेबल असणार आहे.

या फिटनेस ट्रॅकरमध्ये ब्लड ऑक्सिजन सेन्सर (ऑप्टिकल), 3-ऐक्सिस एक्सीलेरोमीटर आणि जायरोस्कोप, ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर देण्यात आले आहेत. रनिंग, इनडोअर रनिंग, फॅट बर्न रनिंग, आउटडोअर वॉक, मैदानी सायकलिंग, इनडोअर सायकलिंग, ऐलिप्टिकल ट्रेनर, रोइंग मशीन, क्रिकेट, बॅटमिंटन, स्विमिंग, योगा आणि फ्री ट्रेनिंग सारखे व्यायामाचे मोड बँडमध्ये असणार आहे.

(वाचा - Motorola चे 4 नवे स्मार्टफोन्स लाँच; जाणून घ्या फोनच्या किंमती आणि फीचर्स)

तसंच हा बँड धूळ, पाणी आणि घाम यांनी खराब होणार नसल्याचा दावा वन प्लसकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे वनप्लसच्या या बँडमध्ये हिंदी फॉन्ट असणार आहे. हा फिटनेस बँड मेसेज, नोटिफिकेशन, इनकमिंग कॉल नोटिफिकेशन (कॉल रिजेक्शन), म्युझिक प्लेबॅक कंट्रोल सह हे विशेष फीचर यात असणार आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, यात ब्लूटूथ 5.0 / ब्लूटूथ एलई देण्यात आला आहे.

First published:
top videos

    Tags: Tech news, Technology