• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • 50MP कॅमेरासह आज लाँच होणार OnePlus 9RT, खास डिस्प्लेसह मिळतील जबरदस्त फीचर्स

50MP कॅमेरासह आज लाँच होणार OnePlus 9RT, खास डिस्प्लेसह मिळतील जबरदस्त फीचर्स

OnePlus आपला नवा स्मार्टफोन OnePlus 9RT आज लाँच करणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजता हा फोन लाँच करण्यात येईल.

 • Share this:
  नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : OnePlus आपला नवा स्मार्टफोन OnePlus 9RT आज लाँच करणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजता हा फोन लाँच करण्यात येईल. OnePlus ने काही दिवसांपूर्वी OnePlus 9RT या स्मार्टफोनचे फीचर्स दाखवणारा Teaser रिलीज केला होता. त्यानुसार, फोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर आणि 120Hz डिस्प्ले दिला जाईल. OnePlus 9 आणि OnePlus 9R प्रमाणे, हा नवीन फोन LPDDR 5 रॅम आणि UFS 3.1 स्टोरेजसह येईल, असं म्हटंल जात आहे. याशिवाय यात 4,500 mAh ची बॅटरी दिली जाईल. या फोनमध्ये 600Hz टच सॅम्पलिंग रेट आणि सुपर-लो लेटन्सी दिली जाऊ शकते. हा फोन 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि तीन रंगांमध्ये येईल, अशीही माहिती आहे. OnePlus 9RT स्मार्टफोनमध्ये 6.55-इंची HD+ AMOLED डिस्प्ले दिला जाईल. 120Hz रिफ्रेश रेट स्क्रीन फोनमध्ये असू शकतो. हा फोन 8 GB / 1GB रॅम आणि 256 GB स्टोरेज अशा पर्यायासह उपलब्ध होऊ शकतो. फोनला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो. प्रायमरी कॅमेरा सोनी IMX766 सेन्सर क्षमतेचा असू शकतो. 50 मेगापिक्सल शिवाय, 2 मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा सेन्सर, 8 मेगापिक्सल किंवा 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा दिला जाऊ शकतो.

  तुमचा फोन Water Resistant आहे की Water Proof, जाणून घ्या काय आहे दोघांमधला फरक

  OnePlus Buds Z2 - OnePlus 9RT सोबत, कंपनी आपले नवीन टीडब्ल्यूएस हेडफोन, OnePlus Buds Z2 देखील लाँच करेल. या इयरबड्समध्ये Noise Cancellation मिळेल. फेस्टिव्ह सीजन सुरु होण्यापूर्वीच अनेक स्मार्टफोन ऑक्टोबरमध्ये भारतीय बाजारात दाखल होत आहेत. जगभरातील स्मार्टफोन कंपन्या दर महिन्याला नवनवीन वैशिष्ट्यांसह त्यांचे स्मार्टफोन सादर करतच असतात. आता OnePlus 9RT लाँच होत असून या बहुचर्चित फोनला कशा प्रतिक्रिया मिळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
  First published: