• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • PUBG च्या 'या' गेमची भारतात वाढतेय क्रेझ; अवघ्या तीन दिवसांत 1 कोटी लोकांनी केला डाउनलोड

PUBG च्या 'या' गेमची भारतात वाढतेय क्रेझ; अवघ्या तीन दिवसांत 1 कोटी लोकांनी केला डाउनलोड

Developer कंपनी क्राफ्टनने Battlegrounds Mobile India (BGMI) हा मोबाईल गेम लॉन्च केला होता. लॉन्चिंगच्या वेळीच हा गेम फार लोकप्रिय होईल असा कयास अनेकांनी लावला होता. तो आता खरा ठरण्याची शक्यता आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : भारतात मागच्या वर्षी स्मार्टफोन गेम PUBG वरकेंद्र सरकारनं बंदी आणली होती. त्यानंतर Developer कंपनी क्राफ्टनने Battlegrounds Mobile India (BGMI) हा मोबाईल गेम लॉन्च केला होता. लॉन्चिंगच्या वेळीच हा गेम फार लोकप्रिय होईल असा कयास अनेकांनी लावला होता. तो आता खरा ठरण्याची शक्यता आहे. कारण आता PUBG New State या मोबाईल गेम्सनं युजर्सला अक्षरश: वेड लावलं आहे. काही दिवसांतच 1 कोटी (PUBG New State Mobile Game) लोकांनी या गेमला डाउनलोड केलं आहे. PUBG New State च्या लॉन्चिंगआधीच गूगल प्ले स्टोर आणि App स्टोरवर या गेम्ससाठी 40 लाख लोकांनी प्री-रजिस्ट्रेशन केलं होतं. हा गेम युजर्ससाठी मोफत असून त्यात 17 भाषांचा (pubg new state early access) पर्याय देण्यात आला आहे. समोर आलेल्या एका नव्या आकडेवारीनुसार या गेमला तिन दिवसांमध्ये एक कोटी लोकांनी डाउनलोड केलं आहे. त्यामुळं हा गेम कमी काळात फार लोकप्रिय होताना दिसत आहे.

  30 मिनटांत Xiaomi च्या 20 लाखांहुन अधिक Smart Watch ची विक्री...पाहा डिटेल्स

  PUBG New State मध्ये काय आहे विशेष? हा Video गेम 2051 सालावर आधारित आहे. त्यात युजर्सला Futuristic Weapons, नकाशे आणि रिमोट कंट्रोल ड्रोनचंही (pubg new state download in india) फीचर देण्यात आलं आहे. त्याचबरोबर नियॉन साइट्स आणि Combat Ballistic Ability सारखे दमदार फीचर्सही या गेममध्ये देण्यात आले आहे.

  Smartphone वर भारतीय रोज घालवतात इतका वेळ! App डाउनलोड करण्यााचा टक्काही वाढला

  असं करा डाउनलोड जर या गेमला डाउनलोड करायचं असेल तर  गूगल प्ले स्टोरवरून ही डाउनलोड करता येऊ शकतं. त्यात या गेमला डाउनलोड करण्यासाठी काही अटी  आहेत. जर तुम्ही Android युजर्स असाल तर तुमच्या स्मार्टफोनमध्ये 2GB रॅम आणि 6.0 चा OS Update असायला हवं. त्याचबरोबर iOS युजर्ससाठी स्मार्टफोनमध्ये कमीत कमी iOS 13 चं अपडेट असायला हवं.
  Published by:Atik Shaikh
  First published: