• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • PUBG Mobile ची लवकरच भारतात होणार एन्ट्री; नव्या नावासह रिलाँच होणार गेम

PUBG Mobile ची लवकरच भारतात होणार एन्ट्री; नव्या नावासह रिलाँच होणार गेम

कंपनीने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर या गेमचं पोस्टर रिलीज केलं आहे. ज्यात हा गेम आता Battleground mobile india नावाने रि-लाँच होणार असल्याचा खुलासा झाला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 4 मे: मोबाईल गेम पबजी खेळणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. अनेक दिवसांनंतर आता PUBG मोबाईल गेम एका नव्या नावासह भारतात लाँच होणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर या गेमचं पोस्टर रिलीज केलं आहे. ज्यात हा गेम आता Battleground mobile India नावाने रि-लाँच होणार असल्याचा खुलासा झाला आहे. कंपनीने याच्या लाँच डेटबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. Battleground Mobile India - एका रिपोर्टनुसार, battle royale गेम PUBG Mobile India नव्या नावाने Battleground Mobile India रि-लाँच होणार आहे. पोस्टर रिलीज झाल्यानंतर, कंपनी नव्या नावाने भारतात पुन्हा येणार असल्याचा खुलासा झाला. परंतु काही तासांनंतर कंपनीने आपल्या फेसबुक पेजवरुन रिलीज केलेलं पोस्टर हटवलं आहे. अधिकृत पोस्टरमध्ये गेमबाबत Coming Soon लिहिलं असून कंपनीच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरही Battleground mobile India पोस्टर आहे. कंपनीच्या यूट्यूब पेज आणि फेसबुक पेजच्या प्रोफाईल पिक्चरच्या रुपात नवं पोस्टर Coming Soon सह देण्यात आलं आहे.

  (वाचा - आता तुमच्या जवळचं वॅक्सिनेशन सेंटर शोधण्यासाठी WhatsAppकरणार मदत;अशी आहे प्रोसेस)

  दरम्यान, गेल्या वर्षी भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69A अंतर्गत PUBG सह अनेक चायनीज अॅप भारतात बॅन करण्यात आले. PUBG सोडून कोणत्याही इतर अॅपने भारतात पुन्हा एन्ट्री करण्यासाठी अधिक प्रयत्न केले नाहीत. PUBG मोबाईल गेम डेव्हलपर कंपनी Crafton आणि केंद्र सरकारमध्ये गेम भारतात पुन्हा लाँच करण्यासाठी अनेकदा बातचीत करण्यात आली. हा गेम भारतात पुन्हा सुरू करण्यासाठी कंपनीला भारत सरकारने घातलेल्या सर्व अटींकडे लक्ष द्यावं लागेल. यापूर्वी कंपनीने, हा गेम खासकरुन भारतासाठी लाँच करणार असल्याचं सांगितलं होतं. PUBG मोबाईलच्या रि-लाँच ट्रेलरमध्ये युजरचा डेटा आणि प्रायव्हसीला सर्वात मोठं प्राधान्य असेल, असंही सांगण्यात आलं होतं.
  Published by:Karishma Bhurke
  First published: