मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

International Yoga Day 2021: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे

International Yoga Day 2021: योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केली M-Yoga ॲपची घोषणा, जाणून घ्या फायदे

आज आपण सातवा आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day 2021) साजरा करत आहोत. जगभरही विविध कार्यक्रमांचं आयोजन करून हा दिवस साजरा केला जात आहे.

आज आपण सातवा आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day 2021) साजरा करत आहोत. जगभरही विविध कार्यक्रमांचं आयोजन करून हा दिवस साजरा केला जात आहे.

आज आपण सातवा आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day 2021) साजरा करत आहोत. जगभरही विविध कार्यक्रमांचं आयोजन करून हा दिवस साजरा केला जात आहे.

नवी दिल्ली 21 जून : भारतातील योग विज्ञान ही आपल्या संस्कृतीची देणगी आहे. तिचा जगभर प्रसार व्हावा म्हणून आधी अनेक योगी पुरुषांनी प्रयत्न केले. भारत सरकारने त्यासाठी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस व्हावा यासाठी प्रयत्न केले आणि आज आपण सातवा आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day 2021) साजरा करत आहोत. जगभरही विविध कार्यक्रमांचं आयोजन करून हा दिवस साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दिवसाचं निमित्त साधून M-Yoga हे ॲप लवकरच सर्वांसाठी उपलब्ध करून दिलं जाणर असल्याचं जाहीर केलं आहे. या ॲपमध्ये कॉमन योगा प्रोटोकॉलनुसार योग प्रशिक्षण देणारे अनेक व्हिडिओ असतील. हे व्हिडिओ जगभरातील अनेक भाषांमध्ये उपलब्ध होतील. जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization) संयुक्त विद्यमाने भारत सरकारने हे ॲप तयार केलं आहे. आंतरराष्ट्रीय योगदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी या ॲपबद्दल म्हणाले,‘ प्राचीन विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या संगमाचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हे ॲप आहे. आता जगाला M-Yoga या ॲपची शक्ती मिळणार आहे. ’ हे M-Yoga ॲप वापरून बघावं अशी इच्छा नक्कीच तुम्हाला झाली असेल. त्यामुळे अधिक माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत की हे ॲप पूर्णपणे सुरक्षित असून यूझरच्या मोबाईलमधून कोणतीही माहिती गोळा करण्याचं काम ते करत नाही. 12 ते 65 वर्ष वयाच्या व्यक्ती या ॲपचा रोजचा योग करणारा जोडीदार म्हणून वापर करू शकतात. योगाचा जगभर प्रसार व्हावा म्हणून या ॲपमध्ये योगासनं कशी करावीत याची साध्या सोप्या भाषेत माहिती दिली जाईल. तसंच या ॲपमध्ये योगासंबंधी व्हिडिओ (Yoga Videos) प्रसिद्ध केले जातील जे जगातील विविध भाषांमध्ये असतील आणि सहज माहिती देतील. Online Financial Fraud झालाय? घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल पंतप्रधान पुढे म्हणाले,‘ संपूर्ण जगात कोविड-19 महामारी पसरली असताना जग योग विज्ञानाकडे (Yoga Science) आशेचा किरण म्हणून पाहत आहे. एवढं मोठं संकट आहे ज्यात लोकांना योगाचा सहज विसर पडला असता त्याची अवहेलनाही त्यांच्याकडून झाली असती पण याच्या उलट झालं आहे आणि लोकांचा योग करण्याचा उत्साह दिवसेंदिवस वाढत चालला आहे. योगाबाबतचं प्रेम खूप वाढलं आहे.’ आपण तणावात असताना आपल्याला शक्तीचा मार्ग योग दाखवतो. आपण नकारात्मक विचारांत असलो, निराश झालो तर रचनात्मक काम (Constructive Work) कसं करता येईल याचा राजमार्ग कुणी दाखवत असेल तर तो म्हणजे योग. जनतेच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी निवारक म्हणून महत्त्वाची भूमिका योग निभावत राहिल असा माझा विश्वास आहे असंही पंतप्रधान म्हणाले. ‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला आज जगभर 7 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी एकत्र येऊन तर काही ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने योगाचा कार्यक्रम होत आहे. सहा वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्रांना (United Nations) अशी विनंती केली होती की 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जाहीर करावा आणि तो साजरा करावा. आता जगातील परिस्थिती इतकी बदलली आहे की जगभरात योग करण्यासाठी लोक आतुर आहेत आणि तो शिकून घेण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत.
First published:

Tags: Application, Yoga, Yoga day

पुढील बातम्या