मुंबई 21 जून**:** अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) आणि तिचा घटस्फोटीत पती अभिनव कोहली (Abhinav Kohli) यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दोघंही सातत्यानं एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. श्वेतानं त्याच्यावर कौटुंबीक हिसाचाराचे आरोप केले होते. यावर उत्तर देताना तिच मला दांड्यानं मारायची असे आरोप अभिनवनं केले. यानंतर आता पुन्हा एकदा अभिनवचा पारा चढला व त्यानं श्वेतावर गंभीर आरोप केले आहेत. माझी मुलं घरात एकटी आहेत अन् ही दक्षिण आफ्रिकेत मजा मारतेय असा दावा त्यानं केलं आहे. अभिनवनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करुन आपल्या राग व्यक्त केला आहे. “स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी विशेष कायदे आहेत. पण आता पुरुषांसाठी देखील अशा कायद्यांची गरज निर्माण झाली आहे. हे कायदे पुरुषांवर होणाऱ्या खोट्या आरोपांपासून त्यांना वाचवतील. माझा मुलगा रेयांश घरात एकटा आहे. त्याची काळजी घेणारं कोणी नाही. अन् ही बाई शोच्या नावाखाली दक्षिण आफ्रिकेत मजा मस्ती करतेय.” असा राग अभिनवनं श्वेताविरोधात व्यक्त केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. महात्मा गांधींचा करिश्मा; भारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार
गहना वशिष्टची जामिनावर सुटका; पॉर्न व्हिडीओ प्रकरणी झाली होती अटक यापूर्वी काय म्हणाली होती श्वेता तिवारी**?** “अभिनवसोबत लग्न करणं हा माझा चुकीचा निर्णय होता. त्यानं माझा मानसिक आणि शारिरिक छळ केला आहे. पलकनं लिहिलेल्या एका पत्रातही त्याचा उल्लेख आहे. मुलांच्या मानसिक स्वास्थाचा विचार करुन मी पतीपासून वेगळे झाले. माझा मुलगा केवळ 4 वर्षांचा आहे अन् त्याला पोलीस आणि कोर्ट म्हणजे काय माहिती आहे.” सध्या श्वेता आणि अभिनवमधील वाद कोर्टात सुरु आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.