Home /News /technology /

Online Financial Fraud झालाय? घाबरू नका, वाचा संपूर्ण पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल

Online Financial Fraud झालाय? घाबरू नका, वाचा संपूर्ण पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल

तुमची ऑनलाईन फसवणूक (online fraud) झाल्यास, पुढे काय करावं याची माहिती असणं आवश्यक आहे. अशा स्थितीत घाबरुन न जाता, काही पाउल उचलून तुमचे पैसे परत मिळवू शकता.

  मुंबई, 21 जून: कोरोना काळात डिजीटल व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. देशात एकीकडे डिजीटल व्यवहारात वाढ होत असताना दुसरीकडे ऑनलाईन फायनेंशियल फ्रॉडची (Online Financial Fraud) प्रकरणंही वाढली आहेत. कोरोना काळात हे प्रमाण अधिकच वाढलं आहे. अशा परिस्थितीत तुमची ऑनलाईन फसवणूक (online fraud) झाल्यास, पुढे काय करावं याची माहिती असणं आवश्यक आहे. अशा स्थितीत घाबरुन न जाता, काही पाउल उचलून तुमचे पैसे परत मिळवू शकता. एखाद्या छोट्याशा चुकीमुळे किंवा इतर कारणांनी ऑनलाईन फायनेंशियल फ्रॉड झाल्यास, तुम्ही तुमचे पैसे रिफंडसाठी प्रयत्न करू शकता, परंतु यासाठी त्वरित काही पाउलं उचलावी लागतील. त्वरित पाउल उचलून नुकसानापासून बचाव होऊ शकतो - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दिलेल्या माहितीनुसार, जर तुमची एखाद्या बेकायदेशीर इलेक्ट्रॉनिक ट्रान्झेक्शमध्ये फसवणूक झाल्यास, तुमची जबाबदारी शून्य देखील होऊ शकते. परंतु ज्यावेळी तुम्ही तुमच्या फसवणुकीची माहिती तुम्ही त्वरित बँकेला दिली, तरच त्याच परिस्थितीत हे शक्य आहे.

  (वाचा - फेसबुकवर मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक, प्रकार ऐकून व्हाल हैराण)

  72 तासांत रिपोर्ट करा - सायबर फ्रॉड झाल्यास, तुमच्या खात्यातून पैसे गेल्यास तुम्हाला तीन दिवसांच्या आता याची तक्रार करावी लागेल. त्याशिवाय https://www.cybercrime.gov.in/ वर स्थानिक पोलीस ठाण्यातही याची तक्रार करू शकता. 10 दिवसांत रिफंड - काही पाउलं त्वरित उचलल्यास तुम्हाला कोणतंही नुकसान होणार नाही. आणि 10 दिवसांच्या आत रिफंड मिळू शकतं. ऑनलाईन फसवणूक झाल्यास, त्याबाबत मौन बाळगू नका. संबंधित माहितीसह बँकेत लेखी स्वरुपात याची माहिती द्या आणि तक्रार दाखल करा.

  (वाचा - Phishing Email म्हणजे नेमकं काय? यापासून राहा सावध, अन्यथा बसू शकतो मोठा फटका)

  हेल्पलाईन - सायबर फ्रॉडमध्ये आर्थिक नुकसानापासून वाचण्यासाठी एक नॅशनल हेल्पलाईन नंबर 155260 लाँच करण्यात आला आहे. सध्या ही सेवा छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगाना, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश अशा 7 राज्यात उपलब्ध आहे. इतर राज्यातही लवकरच ही सेवा सुरू केली जाणार आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Online fraud, Smartphone, Tech news

  पुढील बातम्या