Home /News /technology /

WhatsApp वेरिफाय करण्याच्या नावाने होतोय Phone Hack, चुकूनही करू नका हे काम

WhatsApp वेरिफाय करण्याच्या नावाने होतोय Phone Hack, चुकूनही करू नका हे काम

WhatsApp युजर्सला काही असे मेसेज पाठवले जात आहेत, जे दिसायला अगदी खरेच भासतात, परंतु हे मेसेज युजरचा फोन हॅक करण्यासाठी वापरले जात असल्याचं समोर आलं आहे.

  नवी दिल्ली, 6 एप्रिल : सध्या हॅकर्स जगभरातील WhatsApp युजर्सला निशाणा करत आहेत. WhatsApp युजर्सला काही असे मेसेज पाठवले जात आहेत, जे दिसायला अगदी खरेच भासतात, परंतु हे मेसेज युजरचा फोन हॅक करण्यासाठी वापरले जात असल्याचं समोर आलं आहे. TheSun च्या रिपोर्टनुसार, जगभरात अनेक व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला एक वेरिफिकेशन कोड (Verification Code) पाठवला जात आहे. यात कोडसह एक लिंकही दिली जात आहे. युजर्सला या लिंकवर क्लिक करुन कोड एंटर करण्यासाठी सांगितलं जात आहे. हॅकर्स फोन हॅक करण्यासाठी या नव्या पद्धतीचा वापर करत असल्याचं आढळून आलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवण्यात आलेला कोड, त्यांनी शेअर केलेल्या लिंक पेजमध्ये टाकल्यावर, फोन हॅक होतो.

  (वाचा - Fact Check: सरकारकडून 10 कोटी युजर्सला मिळणार मोफत इंटरनेट? जाणून काय आहे सत्य)

  टेक एक्सपर्ट एलेक्सिसने एक ट्विट करुन सांगितलं की, सर्वात आधी तुमच्या एखाद्या कॉमन मित्राचा फोन हॅक केला जातो. त्यानंतर त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असणाऱ्या मित्रांचे फोन व्हॉट्सअ‍ॅपद्वारे हॅक करण्याचा प्रयत्न केला जातो. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, तुमच्या फोनवर, WhatsApp वर कोणत्याही प्रकारचा सिक्योरिटी कोड आल्यास, त्याकडे दुर्लक्ष करा. पाठवलेला कोड चुकूनही लिंकमध्ये टाकू नका.

  (वाचा - Google वर या गोष्टी अजिबात शोधू नका; एका Search मुळे खावी लागू शकते जेलची हवा)

  तसंच, जर तुम्हाला तुमच्या कोणत्या मित्राचाही या कोडबाबत मेसेज आल्यास त्याकडे दुर्लक्ष करा. फोन हॅक करण्यासाठी विविध प्रकारच्या गोष्टी हॅकर्सकडून केल्या जात असल्याने, बाहेरुन आलेल्या कोणत्याही कोड, लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला जाणकारांनी दिला आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Cyber crime, Hacking, Tech news, Whatsapp

  पुढील बातम्या