नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : Paytm ने आर्म्ड फोर्स, विद्यार्थी आणि सीनियर सिटीजनसाठी फ्लाइट बुकिंगसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये या कॅटेगरीतील प्रवाशांसाठी तिकीटावर खास ऑफर दिली जात आहे. यात 15-15 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट आहे. असे प्रवासी आपले डिटेल्स टाकल्यानंतर फ्लाइट सर्च करू शकतात आणि लागू ऑफर सर्च करू शकतात. इंडिगो, गो एयर, स्पाइसजेट आणि एयरएशियामध्ये बुकिंगसाठी डिस्काउंट ऑफर लागू असेल.
मिळालेल्या माहितीनुसार, या स्पेशल ऑफर अंतर्गत विद्यार्थी 10 किलोग्रॅमपर्यंत एक्स्ट्रा सामान घेऊन जाण्यासाठी बेनिफिट घेऊ शकतात. ही खास ऑफर पेटीएम आणि बँकांकडून आधीपासून असलेल्या ऑफरव्यतिरिक्त आहे.
आर्म्ड फोर्ससाठी ऑफर -
सैन्यातील कर्मचारी, अधिकारी पेटीएमद्वारे फ्लाइट तिकीट बुक करत असतील, तर त्यांना बुकिंगवर 10 टक्क्यांचा कॅशबॅक मिळेल. तसंच एयरलाइनकडून 15 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल. महत्त्वाची बाब म्हणजे तिकीट बुक करताना, ज्यावेळी ऑनलाइन पेमेंट कराल, त्यावेळी एक प्रोमोकोड JAI HIND टाकावा लागेल.
विद्यार्थ्यांना फ्लाइट बुक करताना या ऑफरमध्ये फ्लॅट 10 टक्क्यांचा कॅशबॅक मिळेल. तसंच 10 किलोपर्यंत एक्स्ट्रा सामानही घेवून जाता येईल. फ्लाइट बुक करताना ऑनलाइन पेमेंटवेळी एक प्रोमोकोड YOLO टाकावा लागेल. पेटीएमने या ऑफरला 10+10 ऑफर असं नाव दिलं आहे.
Special fares for Armed Forces, Students and Senior Citizens launched on Paytm. Read up and book now!https://t.co/RTEVuhctPl #specialfares #economictimes
— Paytm Travel (@PaytmTravel) December 7, 2021
सीनियर सिटीजन अर्थात 60 वर्षांहून अधिक वयोगटातील प्रवाशी 300 रुपये कॅशबॅक आणि एयरलाइनकडून 10 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल. सीनियर सिटीजनने फ्लाइट तिकीट बुक करताना, ऑनलाइन पेमेंट करताना प्रोमोकोड SENIOR टाकावा लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Paytm, Paytm offers, Tech news