नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : जर तुम्ही Amazon Prime सब्सक्रिप्शन घेण्याचा विचार करत असाल, तर आता लवकर घेणं फायद्याचं ठरेल. Amazon Prime सब्सक्रिप्शन लवकरचं महाग होणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. Prime मेंबरशिप 13 डिसेंबरपासून महाग होणार आहे. Amazon वेबसाइटनुसार, Prime Membership किंमती मासिक, तीन महिन्यांसाठी आणि वर्षासाठी अशा तीन 3 स्तरांमध्ये वाढवल्या जातील.
प्राइज चेंज Amazon Prime चे महिन्याचे, वार्षिक आणि तीन महिन्याचे प्लॅन महाग होतील. नव्या प्राइज लिस्टनुसार, वर्षभराची प्राइम मेंबरशिप 500 रुपये महाग होणार आहे. म्हणजेच वर्षाचा प्राइम मेंबरशिप प्लॅन 999 रुपये आहे तो आता 13 डिसेंबरपासून 1499 रुपये होईल.
क्वॉर्टली मेंबरशिप प्लॅन ज्याची आताची किंमत 329 रुपये आहे, तो प्लॅन 459 रुपये होईल. महिन्याचा प्लॅन 129 रुपये असून याचं सब्सक्रिप्शन 179 रुपये होईल.
परंतु Prime मेंबरशिप आधीच घेतलेल्या युजर्सवर याचा परिणाम होणार नाही. प्राइम मेंबरशिप संपल्यानंतर त्यांना नव्या किंमतीत सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल. Amazon Prime ने याबाबत आपल्या वेबसाइटवर माहिती दिली आहे.
Prime मेंबरशिपच्या किंमती वाढल्यानंतर Youth मेंबरशिप प्लॅनची किंमत कमी केली जात आहे. हा प्लॅन 18 वर्षांपासून ते 24 वर्षांपर्यंतच्या तरुणांसाठी आहे. याची किंमत 749 रुपयांवरुन 499 रुपये होईल.
Amazon Prime सब्सक्रिप्शन 13 डिसेंबरपासून महाग होणार आहे. यामुळे 13 डिसेंबरआधीच सब्सक्रिप्शन घेतलं, तर जुन्या प्राइजमध्ये, कमी किंमतीत सब्सक्रिप्शन घेता येईल.
दरम्यान, Amazon Prime Membership जुलै 2016 मध्ये 499 रुपयांच्या सुरुवाती किंमतीत भारतात लाँच करण्यात आलं होतं. त्यानंतर 2027 पासून 999 रुपये करण्यात आलं. तेव्हापासून म्हणजेच 2017 नंतर मेंबरशिप कॉस्ट पहिल्यांदाच वाढली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amazon, Amazon subscription, Tech news