नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : पाकिस्तानच्या हॅकर्सने तालिबानला काबूलवर कब्जा करण्यासाठी मोठी मदत केली होती. त्यात अफगाणिस्तानमधील महत्त्वाच्या नेत्यांचं Facebook अकाउंट हॅक (Pakistani hackers target people through Facebook) करण्यापासून ते त्यावर विविध पोस्ट टाकण्यापर्यंतच्या धक्कादायक घटनांचा समावेश होता. परंतु आता फेसबुकने अशा काही पाकिस्तानी हॅकर्सच्या एका ग्रुपला (facebook account hacked) फेसबुकवरून हटवलं आहे. ज्याद्वारे अफगाणी लोकांना टार्गेट करण्यात येत होतं.
यात हॅकर्स हे विविध महिलांच्या नावानं फेसबुक अकाउंट ओपन करून त्याद्वारे लोकांची फसवणूक करत होते. या ग्रुपचं नाव Sidecopy असून त्याद्वारे मागच्या काही काळात शेवटचं अफगाण सरकार आणि सैन्याला टार्गेट करण्यात आलं होतं.
फेसबुकने यूजर्ससाठी जारी केला अलर्ट
फेसबुकने याविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलंय की 'आम्ही त्या सर्व अकाउंट्सला डिलीट केलं असून त्यासंदर्भातल्या पोस्टही आता फेसबुकवर नसतील', त्याचबरोबर आता फेसबुकने सरकारी संस्था सैन्य आणि इतर महत्ताच्या अकाउंटच्या सुरक्षेसाठी हाय अलर्ट जारी केला आहे.
पाकिस्तानी हॅकर्सनी बनावट App द्वारे केली हेरगिरी
पाकिस्तानी हॅकर्सनी Sidecopy च्या माध्यमातून Fake App Store ऑपरेट करून त्याद्वारे अतिमहत्त्वाच्या लोकांचे अकाउंट्स हॅक केले होते. त्याचबरोबर फेसबुक युजर्सच्या स्मार्टफोनमध्ये धोक्यानं (Pakistani facebook hacker) मायवेयरला इन्स्टॉल करण्यात आलं होतं.
त्यामुळं अनेक फेसबुक अकाउंट्स हॅक झाले होते. त्यावर फेसबुकने आता कारवाई केली आहे. या हॅकिंगसाठी हॅप्पीचॅट,Hangon, चॅटआउट, Trendbenter, स्मार्टस्नॅप आणि टेलीचॅट या बनावट Apps चा वापर करण्यात आला होता असंही फेसबुककडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.