• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • GadgetFreeHour: तुम्ही मुलांसाठी सोडणार का तासभर तुमची गॅझेट्स? 5 कोटी पालक सहभागी होणार

GadgetFreeHour: तुम्ही मुलांसाठी सोडणार का तासभर तुमची गॅझेट्स? 5 कोटी पालक सहभागी होणार

गेल्या वर्षी या प्रकल्पात एक कोटींहून अधिक पालक आणि 41,635 शाळांनी सहभाग घेत यशस्वी कुटुंब-कनेक्ट मोहीम राबवली होती. Parent Circle ने आता पुन्हा एकदा GadgetFreeHour चे आवाहन केलं आहे. काय आहे ही संकल्पना? जाणून घेऊया.

 • Share this:
  मुंबई, 16 नोव्हेंबर: तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस नवनवीन गॅझेट्स (Gadgets) बाजारात येत आहे. तुम्ही जागेवर बसून घरातील अनेक कामं आता Gadgets च्या माध्यमातून करू शकता. माणसाचं आयुष्य सुलभ करण्यासाठी आलेली गॅझेट्स आता डोक्याला ताप होऊ लागली आहेत. यामुळे लोकांमधील संवाद संपत चालला असून प्रत्येकजण त्यालाच चिकटलेला दिसत आहे. याचा सर्वात मोठा परिणाम लहान मुलांवर होत असून पालक आणि मुलांमध्ये सुसंवाद होताना दिसत नाहीय. याच पार्श्वभूमीवर पालक आणि मुलांमधील संवाद वाढावा यासाठी पॅरेंटसर्कलने (Parent Circle) पुढाकार घेतला असून जागतिक बालदिनी, (World Children's Day) 20 नोव्हेंबरला पॅरेंटसर्कलने अनोखं आवाहन केलं आहे. यात सहभागी झालेल्या 5 कोटींहून अधिक लोकांनी जागतिक बालदिनी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटपासून एक तासासाठी डिस्कनेक्ट (disconnect) होण्याचं आवाहन केलं आहे. हा एक तास आपल्या मुलांसोबत घालवायचा आहे. गेल्या वर्षी एक दशलक्षाहून अधिक पालक आणि 41,635 शाळांच्या सहभागासह यशस्वी कुटुंब-कनेक्ट मोहिमेनंतर (Family-connect campaign) आता हे आवाहन करण्यात आलं आहे. यावेळी देखील, #GadgetFreeHour ने सोशल मीडियावर 10 दशलक्षाहून अधिक इंप्रेशन मिळविल्यामुळे या चळवळीला वेग आला आहे. यावर्षी, #GadgetFreeHour 20 नोव्हेंबर 2021 रोजी होत आहे, ज्यात सहभागींची संख्या 50 दशलक्षांपेक्षा जास्त होणार आहे," अशी माहिती ParentCircle ने GadgetFreeHour च्या तिसऱ्या आवृत्तीची घोषणा करताना दिलीय. वायरलेस चार्जिंगच्याही पुढचा टप्पा! आता हवेतूनच चार्ज होणार गॅजेट्स; केबल-प्लगचीही गरज नाही! यावर्षी, गॅझेटफ्रीअवर 20 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7.30 ते 8.30 दरम्यान साजरा केला जाईल. “या एका तासात, कुटुंबं त्यांच्या गॅझेट्सपासून डिस्कनेक्ट होतील आणि त्यांच्या मुलांसोबत वेळ घालवतील. मुलांसोबत खेळणे, बोलणे, खाणे आणि एकत्र हसणे; एकमेकांच्या कंपनीचा आनंद घेणे, अशा गोष्टी या एका तासात करायच्या आहेत, अशं पॅरेंटसर्कलच्या संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक नलिना रामलक्ष्मी म्हणाल्या. तामिळनाडू सरकारचा शिक्षण विभाग सर्व शाळांना संदेश पाठवून शिक्षक आणि पालकांना, त्यांच्या मुलांसोबत त्यांच्या व्यस्त ऑनलाइन वेळापत्रकातून विश्रांती घेऊन त्यांच्या कुटुंबासोबत एक तास घालवण्याचे आवाहन करत आहे. केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळांमध्ये गो-गॅजेट-मुक्त (go-gadget-free) संदेश पोहोचवण्यासाठी पुद्दुचेरी सरकारनेही या उपक्रमात सामील झाले आहे. आता मोबाईल सोडा, बोटाच्या सहाय्यानं करता येणार कॉल! प्रत्येकासाठी मौजमजेचा तास बनवण्यासाठी, ParentCircle ने #GadgetFreeHour ऑनलाइन आणि कुटुंबांसाठी #HahaHehe चॅलेंज सुरू केले आहे, ज्यामध्ये सात लाखांहून अधिक लोकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसत आहे. यात 14-दिवसीय ‘बॅक टू चाइल्डहुड’ (Back to Childhood) आव्हान देखील आहे जे पालकांना त्यांच्या मुलांसोबत विविध गोष्टी करत दररोज 5 गॅझेट-मुक्त मिनिटे घालवण्यास प्रोत्साहित करत आहे.
  Published by:Rahul Punde
  First published: