जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / OTT Platform: Amazon-Netflix चा अनुष्का शर्मासोबत अब्जावधींचा करार, सांगितलं कारण

OTT Platform: Amazon-Netflix चा अनुष्का शर्मासोबत अब्जावधींचा करार, सांगितलं कारण

OTT Platform: Amazon-Netflix चा अनुष्का शर्मासोबत अब्जावधींचा करार, सांगितलं कारण

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील (OTT Platform) दोन पॉप्युलर कंपन्या अ‍ॅमेझॉन (Amazon Prime) आणि नेटफ्लिक्सने (Netflix) अनुष्काची कंपनी क्लिन स्लेट फिल्मससह (Clean Slate Filmz) 4 अब्ज रुपयांचा करार केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 25 जानेवारी : भारतीय बाजारात स्पर्धा वाढल्यानंतर नेटफ्लिक्सने (Netflix) आता बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत (Bollywood Actress Anushka Sharma) करार केला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील (OTT Platform) दोन पॉप्युलर कंपन्या अ‍ॅमेझॉन (Amazon Prime) आणि नेटफ्लिक्सने (Netflix) अनुष्काची कंपनी क्लिन स्लेट फिल्मससह (Clean Slate Filmz) 4 अब्ज रुपयांचा करार केला आहे. दोन्ही ओटीटी कंपन्यांनी जगातील सर्वात मोठ्या इंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी फिल्म आणि वेबसीरिजसाठी कंटेंट (Web Series Content) बनवण्यासाठी हा करार केला आहे. कंपनीचे फाउंडर आणि अनुष्का शर्माचा भाऊ करनेश शर्माने सांगितलं, की आम्ही पुढील 18 महिन्यात अ‍ॅमेझॉन आणि नेटफ्लिक्सच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 8 वेब सीरिज आणि चित्रपट रिलीज करणार आहोत. त्याशिवाय इतरही अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्यांनीही क्लिन स्लेट फिल्मससह करार केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. परंतु अ‍ॅमेझॉनकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

हे वाचा -  खांबाला धडकून रक्ताच्या थारोळ्यात पडली महिला, कानातील Smart Device ने वाचवला जीव

नेटफ्लिक्सने मागील महिन्यात आपल्या सब्सक्रिप्शनमध्ये (Netflix Subscription) 60 टक्क्यांची कपात केली होती. सब्सक्रिप्शन प्लॅनच्या किमती कमी केल्यानंतरही बाजारात याची पकड कमजोर होत असल्याचं चित्र आहे. कंपनीने अ‍ॅमेझॉन आणि वॉल्ट डिज्नीला टक्कर देण्यासाठी छोट्या परंतु उद्योन्मुख स्टुडिओ क्लिन स्लेट फिल्मससह करार केला आहे. या स्टुडिओने 2015 मध्ये NH10 हा चित्रपट बनवला होता. भारतीय बाजारात स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक स्वस्त दरातील मनोरंजन शोधत असल्याचं नेटफ्लिक्सचे को-फाउंडर रीड हास्टिंग यांनी म्हटलं आहे.

हे वाचा -  Netflix युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता स्वस्तात घ्या Subscription, तपासा नवे रेट

कोरोना काळात थिएटर बंद होते. त्यामुळे मनोरंजनसाठी अनेकांची ओटीटी प्लॅटफॉर्मला मोठी पसंती होती. परंतु आता परिस्थिती हळू-हळू पुर्वपदावर येत असल्याने फिल्म प्रोडक्शनदेखील पुन्हा जोमात सुरू होत आहे. कोरोना काळात 1.4 अब्ज भारतीयांनी ओटीटी प्लॅटफॉर्मला पसंती दिली, हेच कारण आहे, की अ‍ॅमेझॉन, नेटफ्लिक्ससारख्या कंपन्या आपल्या कंटेंटवर अधिक जोर देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात