नवी दिल्ली, 16 मे : कोरोना काळात Coronavirus पासून वाचण्यासाठी मास्क, हँड सॅनिटायझरचा (Sanitizer) मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कुठेही बाहेर असताना, स्वच्छतेच्या, सुरक्षेच्या दृष्टीने हँड सॅनिटायझर फायद्याचं ठरतं. अनेक जण बाहेर जाताना आपल्यासोबत सॅनिटायझर ठेवतात, कारने प्रवास करतानाही गाडीत सॅनिटायझर ठेवलं जातं. परंतु सॅनिटायझर वापरताना, काळजी घेण्याचं सांगितलं जातं, आगीच्या संपर्कात ते येऊ नये, असा सल्ला अनेकदा दिला जातो. सॅनिटायझरच्या चुकीच्या वापरामुळे मोठा फटका बसू शकतो. अशीच एक घटना समोर आली असून सॅनिटायझरमुळे संपूर्ण कारचं जळाली आहे.
एका कारमध्ये हँड सॅनिटायझरचा वापर करणं, चालकाला चांगलंच महागात पडलं आहे. अमेरिकेत ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये बसलेली व्यक्ती हँड सॅनिटायझर वापरावेळी, स्मोकिंगही करत होती. त्याचवेळी ही आग लागली. गुरुवारी संध्याकाळच्या वेळी ही घटना समोर आली आहे. या घटनेच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ICYMI (~530p) vehicle fire at Federal Plaza, 12200blk Rockville Pike, near Trader Joe’s & Silver Diner, @mcfrs PE723, M723, AT723 & FM722 were on scene (news helicopter video) pic.twitter.com/TeAynaGsgp
— Pete Piringer (@mcfrsPIO) May 13, 2021
व्हिडीओमध्ये एक काळ्या रंगाची कार संपूर्ण जळली असल्याचं दिसतंय. त्यानंतर अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम सुरू होतं. कार चालकाला कारमधून बाहेर काढून रुग्णालयात नेल्याची माहिती आहे. सॅनिटायझरमध्ये ज्वलनशील पदार्थ असल्याने, त्याचा वापर करताना योग्य ती काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Burning car, Car, Sanitizer