जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Oppo Reno 7 Series आज होणार लॉन्च, Sony चा जबरदस्त सेंसर वापरणारा जगातील पहिला Smartphone

Oppo Reno 7 Series आज होणार लॉन्च, Sony चा जबरदस्त सेंसर वापरणारा जगातील पहिला Smartphone

Oppo Reno 7 Series आज होणार लॉन्च, Sony चा जबरदस्त सेंसर वापरणारा जगातील पहिला Smartphone

OPPO ची नवी रेनो 7 सीरिज आज लाँच होणार आहे. Oppo Reno सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन Oppo Reno 7 आणि Oppo Reno 7 Pro भारतात लाँच होणार आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी: OPPO ची नवी रेनो 7 सीरिज आज लाँच होणार आहे. Oppo Reno सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन Oppo Reno 7 आणि Oppo Reno 7 Pro भारतात लाँच होणार आहेत. या फोनची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर (Flipkart) केली जाईल. या फोनसह Oppo Enco M32 Bluetooth Headset देखील लाँच केला जाईल. याची किंमत 1799 रुपये असल्याची माहिती आहे. 5G मध्ये उपलब्ध असणाऱ्या या Oppo Reno 7 Pro स्मार्टफोनमध्ये सोनी आयएमएक्स 709 सेंसर (Sony IMX 709 Ultra Sensing) मिळेल. मोबाइल फोनमध्ये वापर करण्यात येणारा हा जगातील पहिला सेंसर असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन नोटिफिकेशन लाइट ओर्बिट ब्रीथिंग लाइटसह येईल. मेसेज आल्यानंतर ही लाइट युजर्सला अलर्ट करेल. Oppo Reno 7 Pro कॅमेरा - Oppo Reno 7 Pro फोनला बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या पॅनलमध्ये 32 मेगापिक्सल Sony IMX709 अल्ट्रा सेंसिंग कॅमेरा आहे. यात फ्लॅगशिप सोनी आयएमएक्स 766 सेंसर (Sony IMX766 Sensor) असणारा 50 मेगापिक्सल कॅमेरा असेल. हा कॅमेरा सेंसर दुसऱ्या मोबाइल कॅमेराच्या तुलनेत प्रकाशासाठी 60 टक्के जास्त सेंसेटिव्ह आहे.

हे वाचा -  WhatsAppकडून 20लाखांहून अधिक भारतीय युजर्सचे अकाउंट बॅन,तुम्हीही अशी चूक करू नका

Oppo Reno 7 Pro फीचर - Oppo Reno 7 Pro 5G मध्ये 6.55 इंची फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. याचं रेजॉल्युशन 1080×2400 पिक्सल आहे. या स्मार्टफोनला मीडियाटेक डायमेंसिटी 1200 मॅक्स प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 12GB रॅम असून फोनला 4500mAh डुअल सेल बॅटरी देण्यात आली आहे, जी 65W फास्ट चार्गिंजसह येते. Oppo Reno 7 Series स्मार्टफोन विना वायर कंप्यूटरला अटॅच होऊ शकते. तसंच याचा डेटा ट्रान्सफर स्पीड 45mb प्रति सेकंद आहे.

हे वाचा -  Alert! Android Smartphone वापरताना एक चूक पडेल भारी, थेट बँक अकाउंटला धोका

Oppo Reno 7 किंमत - Oppo Reno 7 स्मार्टफोन भारतात 8GB रॅम आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेज क्षमतेसह लाँच केला जाईल. या मॉडेलची किंमत 31,490 रुपये असेल. तर Oppo Reno 7 Pro स्मार्टफोनची किंमत 47,990 रुपये असू शकते. हा फोन 12GB रॅम + 256GB स्टोरेज वेरिएंटमध्ये लाँच केला जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात